Jump to content

हास्टिंग्ज बंडा

हास्टिंग्ज बंडा

मलावी ध्वज मलावीचा पहिला राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
६ जुलै १९६६ – २४ मे १९९४
मागील एलिझाबेथ दुसरी (मलावीची राणी ह्या पदावर)
पुढील बकिली मुलुझी

मलावीचा पंतप्रधान
कार्यकाळ
६ जुलै १९६४ – ६ जुलै १९६६

जन्म मार्च किंवा एप्रिल १८९८
कासुंगू, ब्रिटिश साम्राज्य (आजचा मलावी)
मृत्यू २५ नोव्हेंबर, १९९७
जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका

हास्टिंग्ज कामुझू बंडा (मार्च/एप्रिल १८९८ - २५ नोव्हेंबर १९९७) हा अफ्रिकेतील मलावी देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. अमेरिका व स्कॉटलंड मध्ये शिक्षण घेतलेला व पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेला बंडा १९४१ ते १९४५ दरम्यान इंग्लंडमध्ये वैद्यकीय सेवा करीत होता. १९५८ साली तो न्यासालँडला परतला व त्याने स्वातंत्र्यलढ्यामध्ये भाग घेतला. ६ जुलै १९६४ रोजी मलावीला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बंडा देशाचा पहिला पंतप्रधान बनला. परंतु केवळ २ वर्षांमध्ये संपूर्ण सत्ता एकवटून बंडाने स्वतःला मलावीचा राष्ट्राध्यक्ष घोषित केले व एकपक्षीय पद्धतीखाली पुढील २८ वर्षे तो मलावीचा राष्ट्रप्रमुख व हुकुमशहा रहिला.

शीत युद्धादरम्यान त्याने पश्चिमात्य देशांना पाठिंबा दिला. त्याच्या कार्यकाळात मलावीमधील पायाभूत सुविधा व शैक्षणिक संस्था सुधारल्या. परंतु त्याची राजवट आफ्रिकेमधील सर्वात जुलुमी मानली जाते. त्याने आपल्या सर्व राजकीय विरोधकांची हत्या केली. त्याच्या काळात अंदाजे १८,००० लोक मृत्यूमुखी पडले असावे असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली वर्णद्वेषी द्क्षिण आफ्रिकेसोबत संपूर्ण संबंध ठेवणारा मलावी हा आफ्रिकेतील एकमेव देश होता.

बाह्य दुवे