Jump to content

हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग

हावडा–चेन्नई रेल्वेमार्ग
प्रदेशपश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेशतमिळनाडू
मालकभारतीय रेल्वे
चालक दक्षिण पूर्व रेल्वे, पूर्व तटीय रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी १,६६१ किमी (१,०३२ मैल)
ट्रॅकची संख्या १/२
गेज १६७६ मिमी ब्रॉड गेज
विद्युतीकरण २००१ साली पूर्ण
कमाल वेग १३० किमी/तास
मार्ग नकाशा

हावडा-चेन्नई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. कोलकाताचेन्नई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,६६१ किमी लांबीचा मार्ग पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेशतमिळनाडू ह्या राज्यांमधून धावतो. खरगपूर, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, विजयवाडा इत्यादी भारतातील मोठी शहरे ह्याच मार्गावर आहेत. हा मार्ग भारताच्या पूर्व किनारपट्टीला समांतर धावतो.

प्रशासकीय सोयीसाठी हा मार्ग खालील ४ पट्ट्यांमध्ये विभागला गेला आहे.

  • हावडा-खरगपूर पट्टा
  • खरगपूर-खुर्दा रोड पट्टा
  • खुर्दा रोड-विशाखापट्टणम पट्टा
  • विशाखापट्टणम-विजयवाडा पट्टा
  • विजयवाडा-चेन्नई पट्टा

हावडा व चेन्नई दरम्यान धावणारी कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा-चेन्नई मेल इत्यादी गाड्या ह्याच मार्गाचा वापर करतात.