हान्स झिमर
हांस झिमर | |
---|---|
२०१८ मध्ये झिमर | |
जन्म नाव | हांस फ्लोरियन झिमर |
जन्म | १२ सप्टेंबर १९५७ फ्रँकफर्ट, जर्मनी |
कार्यक्षेत्र | संगीत, वादन, पार्श्वसंगीतकार |
पुरस्कार | ऑस्कर पुरस्कार, ग्रामी पुरस्कार |
संकेतस्थळ | http://hanszimmer.com |
हांस फ्लोरियन झिमर (जन्म १२ सप्टेंबर १९५७) हे जर्मन संगीतकार आहेत. पारंपरिक वादन पद्धतीमध्ये इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर करून ते संगीत लिहितात. १९८० सालापासून झिमर ह्यांनी एकूण १५० पेक्षा अधिक चित्रपटांना संगीत दिले आहे. द लायन किंग (ह्या चित्रपटासाठी त्यांना १९९५ साली सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीतकाराचा ऑस्कर पुरस्कार मिळाला), क्रिमसन टाईड, ग्लॅडीयेटर, द पाईरेट्स ऑफ द कॅरीबियनची मालिका, द डार्क नाईट, इंसेप्शन, इंटरस्टेलार, डंकर्क, ब्लेड रनर २०४९ आणि ड्युन हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट आहेत. [१]त्यांना चार ग्रामी पुरस्कार, तीन क्लासिकल बीआरआयटी पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.दिग्दर्शक रिडली स्कॉट, रॉन हाउवर्ड, गोर वर्बीनस्की, माईकल बे, गाय रिची आणि क्रिस्टोफर नोलॅन ह्यांच्या बरोबर झिमर ह्यांनी अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे.
सुरुवातीचे आयुष्य
झिमर ह्यांचा जन्म फ्रँकफर्ट, जर्मनी येथे झाला. त्यांनी लहान वयातंच पियानो शिकायला सुरुवात केली. पण काही दिवसांनंतर त्यांचे पियानो शिक्षण थांबले. [२]स्वीत्झर्लंड देशातील कॅन्टन बर्न ह्या शहरातील ईकोल दी ह्युमनीटी ह्या आंतरराष्ट्रीय शाळेत त्यांना पाठवण्यात आले. त्यानंतर ते लंडनमधील हर्टवूड हाउस ह्या शाळेत शिक्षण घेतले. [३]लहानपणीच ते एनियो मोरीकॉन ह्यांच्या संगीताने प्रभावीत झाले आणि वन्स अपॉन अ टाईम इन वेस्ट ह्या चित्रपटाच्या संगीताचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला.[४]
गौरव आणि पुरस्कार
डिसेंबर २०१० मध्ये हॉलीवूड वॉक ऑफ फेम मध्ये झिमर ह्यांना एक स्टार देण्यात आला.
२०१८ पर्यंत झिमर ह्यांना अकरा अकादमी पुरस्कारांची नामांकने मिळाली आहेत.
२०१९ मध्ये झिमर ह्यांचा डीझनी लेजेंड म्हणून गौरव करण्यात आला.
अकादमी पुरस्कार
१९९४: द लायन किंग (सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत)
गोल्डन ग्लोब
१९९५: द लायन किंग (सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत)
२००१: ग्लॅडीयेटर (लिसा जेरार्ड ह्यांच्याबरोबर)
ग्रामी पुरस्कार
१९९५: द लायन किंग (सर्वोत्कृष्ट सांगीतिक रचना)
१९९५: द लायन किंग (लहान मुलांसाठी सर्वोत्कृष्ट अल्बम)
१९९६: क्रिमसन टाईड
२००९: द डार्क नाईट (जेम्स न्यूटन हाउवर्ड ह्यांच्याबरोबर)
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Filmtracks: Hans Zimmer". www.filmtracks.com. 2021-11-09 रोजी पाहिले.
- ^ realhanszimmer (2013-06-11). "My formal training w…". r/IAmA. 2021-11-10 रोजी पाहिले.
- ^ "Hurtwood House Performing Arts". web.archive.org. 2010-02-21. रोजी मूळ पानापासून संग्रहित2010-02-21. 2021-11-10 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Ennio Morricone – my inspiration, by Hans Zimmer". Gramophone (इंग्रजी भाषेत). 2021-11-10 रोजी पाहिले.