हातोडा
हातोडा (अन्य नावे: हातोडी ; इंग्रजी: Hammer, हॅमर ;) हे हाताने गती देऊन लक्ष्यावर ठोका मारण्यासाठी वापरले जाणारे अवजार आहे. याच्या संरचनेत हातांत धरण्यासाठी एक दांडा व दांड्याला अग्रास धातू किंवा तत्सम पदार्थाचा वजनदार तुंबा, अर्थात ठोकळा, असतो. हातोड्याचा दांडा हातांत धरून त्यास गती दिली जाते व नेम धरून तुंब्याचा प्रहार लक्ष्यावर केला जातो. आकारमानाने लहान असणाऱ्या, हलक्या वजनाच्या हत्यारांस हातोडी अशी संज्ञा वापरली जाते.
हातोडा हे मानवी इतिहासातले बहुदा सर्वांत प्राचीन हत्यार आहे. ज्ञात पुराव्यांनुसार इ.स.पू. २६,००,००० च्या सुमारासदेखील दगडी हातोडे प्रचलित होते.
चित्रदालन
- खिळे काढण्याचीही सोय असलेली हातोडी
- चित्रास चौकट(फ्रेम) करण्यासाठी वापरण्यात येणारी हातोडी
- भूशास्त्रज्ञाची हातोडी
- सोफा वगैरे बनविण्यासाठी वापरण्यात येणारी हातोडी
- Cross-peen hammer
- गोल तुंब्याची हातोडी
- रबरी हातोडी
- पत्र्यावर काम करण्यासाठी वापरण्यात येणारी लाकडी हातोडी
- दगडास खाच पाडून बनविलेली हातोडी
- लोहारकामासा ठी वापरण्यात येणारी हातोडी
- लोहारकामासाठी वापरण्यात येणारी हातोडी
- लोहारकामासाठी वापरण्यात येणारी हातोडी
- गोल तुंब्याची हातोडी
- सपाट बुडाची हातोडी
- Bush hammer
- यांत्रिक हातोडा
बाह्य दुवे
- हातोड्याच्या प्रकारांविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)
- 'हॅमर म्यूझियम' नावाच्या हातोड्यांच्या संग्रहालयाचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)