हाटकर
हाटकर किंवा हटकर धनगर ही प्राचीन पशुपालक योद्धा जमात आहे. यांना हट्टी धनगर/ बरहट्टा / बरगे / बंडे / झेंडे / मेंढे / ठेलारी / तेलवर (लिंगायत) या नावाने देखील ओळखले जाते. हाटकर मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश मध्ये वास्तव्यास आहेत.[१]
हटकर हा शब्द हट्टीकारा या कन्नड शब्दावरून आला आहे. कानडी-मराठी शब्दकोशामधे हट्टी म्हणजे गाई-बैल असा अर्थ दिलेला अढळतो. हट्टीकारा म्हणजे गाईबैलांचा मालक. हटकर हे पशुपालक असले तरी चालुक्य, होयसळ राजघराण्यांचे सेनापती सैनिक हे हटकर असल्याचे उल्लेख कन्नड शिलालेखांमधे सापडतात.
महाराष्ट्रात असलेले हटकर ही एक लढाऊ जमात आहे. परंपरेने लढाई करणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. यातूनच त्यांच्यात अनेक मोठी सरदार घराणी उदयाला आल्याचे दिसते. यांत सरदार धायगुडे, राजेपांढरे, बळंवतराव किताब असलेले देवकाते, राजे सरगर, मासाळ, हंडे इ. घराणी सापडतात यांत नेमाजी शिंदे या हटकर मराठी वीराने सर्वप्रथम नर्मदा नदी ओलांडली; त्याच काळात दामाजी थोरात हे एक पराक्रमी सरदार, तर त्यांचे सेनापती ग्यानाजी होडगिर हे होते. ते मूळ वाई रियासतीतील होते.
हटकरांना हट्टीकारा, बाराहट्टी, बरहट्टी, झेंडे, बंडगर, बंडे, बर्गी धनगर, बारगीर या ना्वांनीसुद्धा ओळखले जाते. आज हटकर जमातींमधील काही आडनावे-
(विदर्भ आणि मराठवाड्यातील):- थिटे (पाटील) भंडे,
नरूटे(पाटील),भांबेरे (पाटील),नप्ते,चोरमले,कन्नर,कुन्नर,नेवडे,जरारे,जेढर, शेळके,शिंदे,काळे, सोनुने,हाके,इतवारे,रामेकर, वाघमोडे,सोर,
बादाड, संसारे, आवाड, नेमाने, माटे, डोने, पाराधे, पारखे ,बंडगर,घोडके,धरणे, कारंडे, करे, कोकरे,कोळगिर, कोळेकर, गडदे, गावडे, गोरड, होडगिर, धुळगंडे, भोरगिर, नरवटे, कर्ले, जानकर, थोरात, धायगुडे, देवकर, देशमुख, घुगरे, देवकाते, नरुटे, पडळकर, पाटील, पांढरे, पुणेकर, पोले, भिसे, मसरक, माने, मार्कंड, मार्कडे, मासाळ, मासुळे, मेमाणे, मोरे, लवटे, लोखंडे, मस्के, वडकुते, वलेकर, वलकर, वाघमारे, वाघमोडे, शिंगाडे, शिंदे, सरोदे, सरगर, सदगर,सलगर, सापनर, सुरनर,राऊतराय,सूळ, सोलणकर किंवा सोनवलकर, हंडे, हराळ, मारकड, हाके, होडबे, हापगुंडे आहेत.
तसेच काही हटकरांना पाटील, राव, नाईक, देशमुख, राजे, मानकरी या उपाध्या आहेत. विदर्भात आणि मराठवाड्यात हटकरांची संख्या खुप आहे पण काही हटकर म्हणतात तर काही धनगर म्हणतात तर काही हटकर धनवर म्हणतात. मराठवाड्यातील व विदर्भ भागात हटकर पाटील प्रामुख्याने आढळतात हे लोक अतिशय सदन असून उच्चशिक्षित आहे आणि यांचा मूळ व्यवसाय शेती आहे.
Captain Fitzgerald यांच्या मते उत्तर हिंदुस्थानातून १३ व्या आणि १४ व्या शतकात महाराष्ट्रात बारा कुळींचे लोक एकत्र आले आणि त्यांनी एक बारा-हट्टी गाव तयार केले. त्याला बाराहट्टीचा देश म्हणू लागले. सध्या या भागाला हिंगोली आणि आजूबाजूचा परिसर म्हणून ओळखले जाते आणि यावरूनच पुढे हटकर असे नाव पडले.
"१४ व्या शतकात जेव्हा निजाम दख्खनचा सुभेदार म्हणून आला होता त्याच काळात हटकरसुद्धा आले होते असे ते म्हणतात" सर्व हटकर जेव्हा कधी मोहिमेवर जातात तेव्हा हातात एक भाला आणि तलवार घेऊनच निघतात. त्यामुळे त्यांना बर्गी किंवा बारगीरसुद्धा म्हणले जाते.
अकबराने 'ऐन-ए-अकबरी' नामक ग्रंथात हटकरांचा उल्लेख केला आहे, तो असा - "हटकर हे स्वाभिमानी आहेत, ही राजपुतांची पराक्रमी आणि घमंडी प्रकारची जात आहे. त्यांनी बाशीम (सध्याचे वाशीम) येथे सशस्त्र सेना तयार केली आहे त्यांच्याकडे १००० घोडदळ आणि ५००० पायदळ सैन्य आहे. त्यांनी आजूबाजूचे राज्य आणि किल्ले कबजात ठेवले आहेत. त्यांना धनगर पण म्हणतात पण ते राजपूत आहेत आणि हे खरे आहे."
हटकर जमात मुळातच लढवय्ये होती. ब्रिटिश काळात इसवी सन १८००-१८२० या काळात जमातीने नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात धुमाकूळ घातला. हंसाजी नाईक हटकर हा त्यांचा नेता होता. त्यांनी नांदेड व वऱ्हाड मधील अनेक प्रमुख ठाणी आपल्या ताब्यात घेतली. त्यांचे ‘नोवा‘(जिल्हा नांदेड) हे प्रमुख ठाणे होते. या ठाण्याला इंग्रजांनी ८ जानेवारी १८१९ रोजी वेढा घातला. तेव्हा किल्ल्यात एक महिना संघर्ष चालू होता. हंसाजी नाईक यांनी एक महिना ब्रिटिशांविरुद्ध झुंज दिली.
निजामाच्या राज्यात हटकरांचा दरारा होता. आणि ब्रिटिशांच्या काळात त्यांना सतत युद्धाला उभे राहणारे आणि बंड करण्यात कुख्यात आहेत, असेच समजले जाते. हटकरांमध्ये युद्धात छातीवर वार घेणे आणि शहीद होणे ही अभिमानाची गोष्ट समजली जाते. हटकरांमध्ये मिश्या कधी कापत नाहीत. मिश्या ठेवणाऱ्यांना मान दिला जातो. हटकर पुरुष हे शारीरिक दृष्ट्या धष्टपुष्ट, स्वतंत्र राहणारे, आणि स्वाभिमानी असतात. हटकरांना महाराष्ट्र सरकारने त्यांना भटकी जमात वर्ग-२ म्हणजे (NT-C) प्रवर्गात समाविष्ट केले आहे. महाराष्ट्रात आल्यावर यांचा मुख्य व्यवसाय शेती होता. पण मूळचेच शूर असल्यामुळे यातील काही सैन्यात भरती झाले आणि काहींनी गावातील प्रशासनात सहभाग घेतला.
हटकरांचा ध्वज : हटकरांचा स्वतःचा वेगळा ध्वज असतो, निजामाच्या काळात हटकरांची संख्या अधिक होती. त्यांच्या लष्करी पेशाला शोभेल असा झेंडा त्यांच्याकडे असे, झेंड्याचा वरील भाग हा पिवळा असून खालच्या बाजूला तो लालसर रंगाचा असे. समाजातील कुठल्याही सामाजिक कार्यात, किंवा युद्धाच्या वेळी हटकर स्वतःचा झेंडा घेऊनच निघतात. इतिहासात अशाच प्रकारचे झेंडे दोन साम्राज्यांचे आहेत. एक म्हणजे दक्षिणेतील विजयनगरच्या साम्राज्यातील वडियार घराण्याचे म्हैसूरचे राज्य. त्यांचा झेंडा तंतोतंत असाच आहे. आणि दुसरे म्हणजे राजस्थान आणि पंजाब मधील भाटी राजपुतांच्या राज्याचे झेंडे. हे झेंडे रंगाने मिळते जुळते आहेत.महाराष्ट्रात धनगर समाजाचे दोन मुख्य प्रवाह आहेत असे सांगितले जाते त्यापैकी एक म्हणजेच हटकर होय. आज हटकर समाज शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या पुढारलेला असून विविध राजकीय व प्रशासकीय व्यक्ती समाजाने दिलेले आहेत. हटकर समाजा मध्ये उच्च साक्षरता दर असून आर्थिक दृष्ट्या हा गट सधन आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हटकर सरदारांची नावे-
- निम्बाजी पाटोळा
- हिरोजी शेळके
- दादाजी काकडे
- बळवंतराव देवकाते
- व्यंकोजी खांडेकर
- अंगदोजी पांढरे
- धनाजी शिंगाडा
- भवाणराव देवकाते
- बनाजी बिर्जे
- येसाजी थोरात
- संभाजी पांढरे
- गोदाजी पांढरे
- इन्द्राजी गोरड
- नाईकजी पांढरे
- ग्यानुजी होडगिर
- तुका पोले
- भगाजी करे
घराणी
छत्रपती शिवाजी महाराजानंतर मराठे आणि औरंगजेब यांच्यात ज्या लढाया झाल्या त्यामधून प्रसिद्ध झालेली हटकर सरदारांची घराणी- १. देवकाते २. बंडगर ३. शेंडगे ४. कोळेकर ५. होडगिर ६. गोफणे ७. वाघमोडे ७. काळे ८. धायगुडे ९. शिंदे १०. मासाळ ११. हजारे १२. मदने १३. खरात १४. शेळके १५. सलगर १६. पुणेकर १७. पाटोळे १८. खताळ १९. माने २०. फणसे २१. टकले २२. बारगळ २३. शिंगाडे २४. डांगे २५. काकडे २६. गाढवे २७. महानवर २८. बरगे २९. हाके ३०. रूपनवर ३१. गलांडे ३२. भानुसे ३३. सोलणकर किंवा सोनवलकर ३४. बने ३५. आगलावे ३६. वाघे ३७. वाघमारे ३८. पांढरे ३९. सदगर ४०. लवटे ४1. करे ४२. कोकरे ४३. वलकर किंवा वलेकर.44 पौळ ( पवार ) 45. मस्के 46. शेम्बडे 47. देवकते 48.
[२][३][४][५]