Jump to content

हाक्रा संस्कृती

हाक्रा संस्कृती (इ.स.पू. ३८०० - ३२००)
पाकीस्तानात सरस्वती नदीला हाक्रा असे नाव आहे. त्यामुळे तेथे सापडलेल्या सिंधु पूर्व संस्कृतीला हाक्रा संस्कृती असे नाव दिले गेलेले आहे. डॉ.रफिक मोगल यांनी तेथे चोलीस्तानच्या वाळवंटात केलेल्या अन्वेषणात ही संस्कृती उजेडात आली. तेथे बहावलपूर जिल्ह्यात या संस्कृतीची शंभराहून अधिक स्थळे त्यांनी शोधून काढली आहेत. भारतातही अशी काही स्थळे सापडली आहेत. पाकीस्तानात हडप्पा आणि जलीलपूर आणि भारतात कुणाल (हरीयाणा) येथील हाक्रा संस्कृतीच्या वसाहतींचे उत्खनन झालेले आहे. हाक्रा संस्कृती ही ग्रामीण संस्कृती होती. मातीच्या आणि कुडाच्या भिंती असलेल्या झोपड्यात हे लोक राहत असत. लाकडी वाशांवर छत उभारले जाई. थोडीफार शेती, पशुपालन आणि क्वचित शिकार आणि मासेमारी यावर लोक गुजराण करीत. तांबे हा धातू त्यांना माहित होता पण ते दुर्मिळ होते त्यामुळे हे लोक हाडांची हत्यारे बनवित. या लोकांच्या भांड्याचे घाट, त्यावरील नक्षी यांचे सिंधु संस्कृतीच्या भांड्यांशी विलक्षण साम्य आहे.