हस्ताक्षर
हस्ताक्षर म्हणजे आपल्या बोटांमध्ये धरलेल्या लेखणी, पेन्सिल, खडू किंवा अन्य साधनांच्या सहाय्याने केलेल्या अक्षरांचे लिखाण होय. हस्ताक्षरातील लिखाण करताना पेन-पेन्सिल यांचे वळण एक समान नसते. काहींचे एका रेषेत सरळ तर काहींचे तिरपे, तर काहींचे रेषेच्या वर खाली होत असते. सर्वच लोकांचे हस्ताक्षर चांगले असतेच असे नाही. हस्ताक्षर ही एक कला असून ती सर्वांना सहज आत्मसात करता येऊ शकते. याला प्रयत्नांची आणि सातत्याची जोड असावी लागते.[१]नियमित सराव केल्यास आपले हस्ताक्षर सुंदर होऊ शकते.
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ दिनेश मराठे (२९ डिसेंबर २०१७). "हस्ताक्षर हे मानवी जीवनास सर्वोत्तम आकार देते - बार्ट बॅगेट". दैनिक सकाळ. २९ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.