हस्तलिखिते
हस्तलिखिते म्हणजे हाताने लिहिलेले ग्रंथ. हे मुख्यत: भूर्जपत्र अथवा ताडपत्रावर लिहिलेले असतात. अशा ग्रंथांच्या संग्रहाला सरस्वती भांडागार असे म्हणले जाते. अशी भांडागारे विविध मठांमध्ये , राजे-रजवाड्यांच्या संग्रही असत. अशा हस्तलिखितांमध्ये धर्म, तत्त्वज्ञान, काव्य आणि नाटक या विषयांचे ग्रंथ अधिक आढळतात. ग्रंथांचे लेखन ही तुलनेने अवघड गोष्ट असल्याने अशा ग्रंथांची जपणूक चांगल्या प्रकारे केली जात. महाराष्ट्रातील उपलब्ध हस्तलिखिते लिहिण्यात सर्व समाजातील लोकांचा समावेश दिसून येतो.[१]
भूर्जपत्रावर लिहिलेल्या अनेक जुन्या ग्रंथांपैकी धम्मपद एक असून ते दुसऱ्या किंवा तीसऱ्या शतकात खरोष्ट्री लिपीत लिहिलेला आहे.संयुत्तगम हा बौद्ध ग्रंथ चौथ्या शतकातील आहे.
पद्धती
ताडपत्राची ओलसर पाने प्रथम कोरडी करून मग आवश्यक त्या आकारात कापून घेत.त्यावर लिहायचा मजकूर अणकुचीदार पदार्थाने कोरून घेत आणि मग त्यावर काजळासारखा काळा रंग फासत.
संदर्भ आणि नोंदी
- ^ भारतीय संस्कृती कोश खंड दहावा