हसमुख धीरजलाल सांकलिया
हे एक भारतीय पुरातत्त्ववेत्ते होते. | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
जन्म तारीख | डिसेंबर १०, इ.स. १९०८ मुंबई |
---|---|
मृत्यू तारीख | जानेवारी २८, इ.स. १९८९ पुणे |
नागरिकत्व |
|
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय |
|
कार्यक्षेत्र | |
पुरस्कार |
|
हसमुख धीरजलाल सांकलिया (प्रचलित नाव - एच.डी. सांकलिया) (जन्म : १० डिसेंबर, इ.स. १९०८. मुंबई मृत्यू : २८ जानेवारी, इ.स. १९८९. पुणे) हे भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे एक पुरातत्त्ववेत्ते होते.
जीवन
एच.डी. सांकलिया यांचा जन्म मुंबई येथे एका गुजराती कुटुंबात झाला. सुरुवातीला सांकलिया संस्कृतचे अभ्यासक होते. त्यांनी नालंदा विद्यापीठ या विषयात एम.ए. केले होते. नंतर त्यांनी "गुजराथचा पुरातत्त्वीय अभ्यास" या विषयावर लंडन विद्यापीठाची आचार्य (पीएच.डी.) ही पदवी मिळवली.
भूषविलेली पदे
- इ.स. १९३९ - ७३ - डेक्कन कॉलेज पुणे येथे इतिहास विभाग प्रमुख आणि प्रोटो इंडियन ॲन्ड एंशंट इंडियन हिस्ट्रीचे प्रोफेसर.
- इ.स. १९५६ - ५९ - डेक्कन कॉलेज पुणे येथे कार्यकारी संचालक.
- इ.स. १९६० - ६८ - डेक्कन कॉलेज पुणे येथे सहसंचालक.
- इ.स. १९७० - ७३ - डेक्कन कॉलेज पुणे येथे संचालक.
- इ.स. १९४८ - ६८ - पुणे विद्यापीठ येथे पुरातत्त्वशास्त्र विभागाचे प्रोफेसर इन चार्ज.
- इ.स. १९७४ - ७६ - विद्यापीठ अनुदान आयोगाचे शिक्षक.
- इ.स. १९७५ - ८९ - टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे स्वीकृत संचालक.
संशोधन
हसमुख धीरजलाल सांकलिया यांनी भारतात ठिकठिकाणी उत्खनने घडवून आणली. पेहेलगाम, नाशिक, अहमदाबादजवळ लांघणज, जोर्वे, नेवासे, पुण्याजवळील इनामगाव, कोल्हापूरजवळ ब्रह्मपूर अशा अननेक ठिकाणी त्यांनी उत्खनने केली. या उत्खननातून मानवी सांगाडे, घरांचे नमुने, नाणी, हत्यारे, दागिणे, धान्यांचे अवशेष असे अनेक प्रकार त्यांना मिळाले. त्यावर अभ्यासपूर्ण संशोधन करून त्यांनी अनेक संस्कृती प्रकाशात आणल्या. ब्रह्मपूरचा रोमशी होत असलेला व्यापार सांकलियांनी दाखवून दिला तसेच द्वारकानगरीची प्राचीनता महाभारत काळापर्यंत जात नाही हे सिद्ध केले. वाङमय व भूगोल यांच्या अभ्यासातून रावणाची लंका म्हणजे श्रीलंका देश नव्हे असे मतही त्यांनी मांडले.
पुरस्कार
- पुरातत्त्वशास्त्रातल्या मौलिक योगदानाबद्दल सांकलियांना भारत सरकारने इ.स. १९७४ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
प्रकाशित साहित्य
- द युनिव्हर्सिटी ऑफ नालंदा (इंग्रजी पुस्तक , १९३४ , १९७३)
- द आर्किऑलॉजी ऑफ गुजरात (इंग्रजी पुस्तक , १९४१)
- प्रिलिमिनरी रिपोर्ट ऑन थर्ड गुजरात प्रीहिस्टॉरिक एक्स्पेडिशन ॲन्ड ह्युमन रिमेन्स डिस्कव्हर्ड सो फार (सहलेखक इरावती कर्वे आणि जी.एम. कुरूलकर) (इंग्रजी पुस्तक , १९४५)
- इन्व्हेस्टिगेशन इनटू प्री-हिस्टॉरिक आर्किऑलॉजी ऑफ गुजरात (इंग्रजी पुस्तक , १९४६)
- हिस्टॉरिकल जिओग्राफी ॲन्ड कल्चरल एथनोग्राफी ऑफ गुजरात (इंग्रजी पुस्तक , १९४९)
- द गोदावरी पॅलिओलिथिक इंडस्ट्री (इंग्रजी पुस्तक , १९५२)
- रिपोर्ट ऑन द एक्स्कवेशन ॲट नाशिक अँड जोर्वे (सहसंपादक - शां.भा.देव) (इंग्रजी पुस्तक , १९५५)
- एक्स्कवेशन ॲट महेश्वर अँड नवदाटोली (इंग्रजी पुस्तक , १९५५)
- फ्रॉम हिस्ट्री टू प्रिहिस्टरी ॲट नेवासा (इंग्रजी पुस्तक , १९६०)
- इंडियन आर्किऑलॉजी टूडे , (इंग्रजी पुस्तक , १९६४)
- प्रीहिस्टरी अँड प्रोटोहिस्टरी ऑफ इंडिया अँड पाकिस्तान (इंग्रजी पुस्तक , १९६३ , १९७३)
- स्टोन एज टूल्स, देअर टेक्निक्स अँड प्रॉबबल फन्कशन्स (इंग्रजी पुस्तक , १९६५)
- चाल्कोलिथिक नवदाटोली (इंग्रजी पुस्तक , १९७१)
- इन्डस सिव्हिलायझेशन (गुजराती पुस्तक , १९६७)
- एक्स्कवेशन ॲट अहर (इंग्रजी पुस्तक , १९६९)
- रामायण मीथ अँड रियालीटी (इंग्रजी पुस्तक , १९७३)
- आर्किऑलॉजी अँड द रामायण (गुजराती पुस्तक , १९७३)
- महाराष्ट्रातील पुरातत्त्व (सहलेखक - म.श्री. माटे) (मराठी पुस्तक , १९७६)
- न्यू आर्किऑलॉजी : इट्स स्कोप अँड एप्लीकेशन इन इंडिया (इंग्रजी पुस्तक , १९७७)
- महाभारत अँड रामायण, फॅन्सी ऑर हिस्ट्री ? (इंग्रजी पुस्तक , १९७७)
- द डॉन ऑफ सिव्हिलायझेशन इन अनडिवायडेड इंडिया # आर्किऑलॉजी अँड द रामायण (गुजराती पुस्तक , १९७७)
- प्रीहिस्ट्री इन इंडिया (इंग्रजी पुस्तक , १९७७)
- द रामायण इन हिस्टॉरिकल परस्पेक्टीव्ह (इंग्रजी पुस्तक , १९८२)
- मेसोलिथिक ॲन्ड प्रीमेसोलिथिक इंडस्ट्रीज ॲट सांगलकल (इंग्रजी पुस्तक , १९९१)
- अन् इन्ट्रोडक्शन टू आर्किऑलॉजी (इंग्रजी पुस्तक , १९६६)
- एक्स्कवेशन ॲट कोल्हापूर
- बॉर्न फॉर आर्किऑलॉजी अन् ऑटोबायोग्रफी
- एक्स्कवेशन ॲट इनामगाव
हे सुद्धा पहा
- भारतीय सर्वेक्षण विभाग
- पुरातत्त्वीय उत्खनन
- भारतीय पुरातत्व सर्वेक्षण
- नाणेशास्त्र
- ननाणेशास्त्र
- शिवराई
- होन
- डॉ. मधुकर ढवळीकर
- भारतीय नाणेशास्त्र शोधसंस्था, अंजनेरी, नाशिक