Jump to content

हर्णे

  ?हर्णे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरदापोली
जिल्हारत्नागिरी जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/
हर्णे बंदरावरील होड्या

हर्णे गाव हे दापोली तालुक्यामधे असून ते रत्‍नागिरी जिल्ह्यामधे आहे. हे गाव समुद्रकिनारा असल्याने बंदर म्हणूनही प्रसिद्ध आहे.या गावात कोळी समाजाची वस्ती असून येथील बंदरावर भरणारा मासळी बाजार प्रसिद्ध आहे.[]

ऐतिहासिक महत्त्व

या गावाच्या समुद्रामध्ये सुवर्णदुर्ग हा प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे.[] इसवी सन १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्याची दुरुस्ती, डागडुजी करून घेतली होती. दादा सेखोजी आंग्रे यांनी या किल्ल्यांच्या चार कोटांचे काम केल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात सापडतात.[][]

भौगोलिक स्थान

हर्णे गाव हे दापोलीपासून जवळ असून मुरुड कर्दे आसूद सालदुरे पाळंदे आंजर्ले, मुरडी ही या गावाच्या नजीकची गावे आहेत.कोकणामधील महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोलीला पोहोचता येते. दापोलीपासून सोळा कि.मी. अंतरावर हर्णे आहे.

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

नागरी सुविधा

  • हर्णे येथे जाण्यासाठी दापोली येथून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस सुविधा उपलब्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून दापोली येथे पोहोचण्यासाठी देखील अशी सुविधा उपलब्ध आहे.
  • जवळचा हवाईमार्ग मुंबई येथील असून तेथून पुढे खेड मार्गे रस्त्याने यावे लागते. (अंतर सुमारे २५० किलोमीटर)
  • रेल्वेने यायचे झाल्यास जवळचे रेल्वे स्थानक खेड असून ते सदर गावापासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे.
  • पर्यटन स्थळ म्हणून हे गाव प्रसिद्ध असल्याने येथे निवास आणि भोजनाची सोय उपलब्ध आहे.[]
दृश्य

चित्रदालन

बाह्य दुवे

  1. https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/dapoli/harnai.html

संदर्भ

  1. ^ "हर्णेकिनारी 'दर्याधना'चा बाजार". Maharashtra Times. 2024-01-01 रोजी पाहिले.
  2. ^ Sep 10, Ashwin KhanAshwin Khan / Updated:; 2018; Ist, 08:39. "Konkan coast tour: Walk by the beach". Pune Mirror (इंग्रजी भाषेत). 2018-09-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-09-14 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  3. ^ Ketakara, Dattātraya Rāmacandra (2001). Bhārata kī ajeya nausenā (हिंदी भाषेत). Prabhāta Prakāśana.
  4. ^ "सुवर्णदुर्गः कान्होजी आंग्रे आणि मराठा आरमारासाठी महत्त्वाचा असलेल्या या किल्ल्याचा इतिहास काय आहे?". BBC News मराठी. 2023-11-13. 2024-01-01 रोजी पाहिले.
  5. ^ Chilka, Amit (2014-09-08). Sea Forts of India (इंग्रजी भाषेत). Osmora Incorporated. ISBN 978-2-7659-0361-1.