हरी रामचंद्र दिवेकर
हरी रामचंद्र दिवेकर (५-१०-१८८४ - १५-८-१९७५) हे वेदविद्याभ्यासक होते. ते महाभारत व वेदकाळाकडे मानवी दृष्टीने पाहणारे संशोधक होते. त्यांचा 'भीष्माची भयंकर भूल' हा लेख वादग्रस्त ठरला होता. 'भारतीय प्राचीन ग्रंथांना अपेक्षित शासनव्यवस्था' हा ग्रंथही त्यांनी लिहिला. बाबराच्या स्मृतिचित्रांचा अनुवादही त्यांनी केला होता.