हरसिम्रत कौर बादल
हरसिम्रत कौर बादल | |
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री | |
विद्यमान | |
पदग्रहण २६ मे २०१४ | |
पंतप्रधान | नरेंद्र मोदी |
---|---|
लोकसभा सदस्य | |
विद्यमान | |
पदग्रहण १६ मे २०१४ | |
मागील | परमजीत कौर गुलशन |
मतदारसंघ | भटिंडा |
जन्म | २५ जुलै, १९६६ दिल्ली |
राजकीय पक्ष | शिरोमणी अकाली दल |
पती | सुखबीर सिंग बादल |
हरसिम्रत कौर बादल (२५ जुलै, १९६६:दिल्ली, भारत - ) ह्या एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेच्या सदस्या व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्या पंजाबचे विद्यमान उप-मुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल ह्यांच्या पत्नी आहेत.
२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी भटिंडा मतदारसंघामधून दुसऱ्यांदा विजय मिळवला. नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री होत्या. १८ सप्टेंबर, २०२० रोजी पारित झालेल्या तीन शेतीविषयक कायद्यांमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे सांगून त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ प्रभू, सुनील. "हरसिम्रत कौर यानी पंतप्रधानांचे मंत्रीमंडळ सोडले". एनडीटीव्ही.कॉम. २०२०-०९-१८ रोजी पाहिले.