हरविंदरसिंग (तिरंदाज)
हरविंदरसिंग याच्याशी गल्लत करू नका.
हरविंदरसिंग हा एक भारतीय तिरंदाज आहे. त्याने जकार्ता येथे सुरू असलेल्या पॅराआशियाड क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा चीनच्या झाओ लिश्यूचा ६-०असा पराभव केला.[१][२][३]
त्याने हे सुवर्ण पदक वैयक्तिक रिकर्व्ह ओपन - डब्ल्यू-२-एसटी गटात मिळविले. डब्ल्यू-२ या गटात पक्षाघात अथवा अन्य कारणाने गुडघ्याखालील पाय गमावणाऱ्यांचा समावेश असतो व त्यांना व्हिलचेअरची गरज असते.
एसटी गटातील तिरंदाजामध्ये मर्यादित दिव्यांगत्व असते.ते व्हिलचेअरविना लक्ष्यभेद करू शकतात.[४]
संदर्भ
- ^ इंडिया टूडे चे संकेतस्थळ
- ^ फर्स्टपोस्ट.कॉम हे संकेतस्थळ
- ^ "आशियन पॅराऑलिंपिकचे संकेतस्थळ". 2018-10-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-10-13 रोजी पाहिले.
- ^ पॅराऑलिंपिक.ऑर्ग हे संकेतस्थळ