Jump to content

हयात रीजन्सी, गुरगाव

हयात रीजन्सी, गुरगाव, भारताच्या गुरगाव शहरातील हॉटेल आहे.[] दिल्ली जवळील गुरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि विमानतळापासून जवळ असलेल्या या हॉटेलात सभा/समारंभ आयोजित करण्याचीही सोय आहे.

ठिकाण

हे हॉटेल दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.८ वर आहे. हे गुरगावचे जिल्हा व्यवसाय आणि वेगाने विकशीत होणाऱ्या औध्योगिक परिसरात आहे.[] हे ठिकाण म्हणजे दिल्ली आगरा जयपुर यांना एकजीव करणारे गोल्डन ट्रंगल म्हणता येईल. पर्यटकासाठी शॉपिंग माल्स, क्यानाट प्लेस,रेड फोर्ट,छत्तरपूर मंदिर,दिल्ली हाट,DLF गोल्फ कोर्स,ITC क्लासिक गोल्फ रिसॉर्ट,सुल्तानपुर बर्ड संकटुरी, नीम राणा प्रकारचे हेरिटेज मेनूमेंट, ही मुख्य आकर्षणे या हॉटेल पासून अगदी नजीक आहेत. कुतुब मिनार खूपच थोड्या अंतरावर आहे.

IGI विमानतळ साधारण ३४ किमी आणि दिल्ली रेल्वे स्थानक साधारण ४६ किमी अंतरावर आहेत.

वैशिष्ट्य

येथे स्पा आणि स्वास्थ्य केंद्र, जिम,पोहण्याचा तलाव, व्यवसाय केंद्र,सभा ग्रह, या सुविधा आहेत.पूर्ण हॉटेल मध्ये संपर्कासाठी वायरलेस सुविधा आहे. हॉटेल मधील रहिवाशी पर्यटक तसेच हॉटेलला भेट देणाऱ्या व्यक्ति यांच्या वाहनासाठी ५०० वाहनांचा वाहन तळं आहे. येथे चार भोजन कक्ष आहेत. त्यात विदेशी आणि देशी पदार्थांची रेलचेल आहे. खान पाण व्यवस्थेचे जे विभाग आहेत ते खालील प्रमाणे आहेत तेथे सेल्फ हेल्प सुविधाही उपलब्ध आहे.

  • लवाणा- येथे अस्सल घरगुती पद्दतीचे खाजगी स्वरूपात आहार आहेत.
  • लौंज- येथे उत्तम लिकर, प्रीमियम चहा,कॉफी घरगुती बनविलेली पास्त्रीज मिळतात.
  • द लोंग बार – निवडक उत्तम मध्य,जगभरातील अत्याधुनिक आणि जुन्या झालेल्या वाइन, आणि कॉकटेल्स मिळतात.
  • किचन डिस्ट्रिक्ट – येथे विविध प्रकारचे आहाराच्या चवी दिवसभर उपलब्ध असतात.

हॉटेल सुविधा

२४ तास स्वागत कक्ष, निर्गमन कक्ष, खोली सेवा,व्यवसाय केंद्र, पोहण्याचा तलाव,जिम,प्रवाशी कक्ष, वाहानतळं, हमाल, सुरक्षा रक्षक, भोजन व्यवस्था, गजर, बार, रेस्टोरंट,कॉफी हाऊस, लिफ्ट, अपंग सुविधा, ध्वनि प्रदूषण विरहित खोल्या, दारवान, स्वच्छता कक्ष, स्वीपर,चलन बदल, स्पा, योगा, भेट वस्तु दुकान, इ. सुविधा आहेत.[]

खोली (रूम)

या हॉटेल मध्ये अतिशय आधुनिकतेने सजविलेल्या आणि आरामदायक व आवश्यक त्या सर्व सुवीधासह खोल्या आहेत.[] प्रत्येक खोलीत मीडिया हब कणेक्टीव्हिटी आणि उच्च दर्जाची इंटरनेट सुविधा आहे. रिजेन्सी क्लब रूम मध्ये मोफत सेवा उपलब्ध आहेत. खोली प्रकार खालील आहेत

  • ह्यात किंग / ट्विन रूम ओन्ली,
  • हयात क्लब रूम,
  • न्याहरीसह हयात ट्विन रूम,
  • एक्स्टेंडेड रेट,
  • सूट सरप्राइज

संदर्भ

  1. ^ "हयात रीजन्सी गुरगाव लाँचेस बेस्ट MICE हॉटेल इन नॉर्थ इंडिया". 2016-02-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-03 रोजी पाहिले.
  2. ^ "फर्स्ट हयात रीजन्सी हॉटेल ओपन्स इन गुरगाव".
  3. ^ "हयात रीजन्सी गुरगाव - फिचर्स".
  4. ^ "रूम्स इन 5 स्टार हॉटेल इन गुरगाव - हयात रीजन्सी गुरगाव". 2016-04-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-03 रोजी पाहिले.