हनुवंतिया
?हनुवन्तिया मध्य प्रदेश • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | • २५८.२७६ मी |
जिल्हा | खंडवा |
भाषा | हिंदी |
हनुवन्तिया हे भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या खंडवा जिल्ह्यात असणारे एक गाव आहे. रस्त्याने नागपूर-बैतुल-खांडवा मार्गे येथे पोचता येते. हे नागपूरपासून सुमारे ३५० किमी अंतरावर आहे. हे गाव नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या इंदिरा सागर बांध या सरोवराच्या अत्यंत जवळ आहे. इंदिरा सागर जलाशय हा सुमारे ९०० वर्ग किमी इतक्या क्षेत्रात पसरला आहे. या जलाशयात सुमारे ९२ बेटे आहेत जी जलाशय पातळीपेक्षा उंचावर आहेत. हे सध्या भारतातील एक मोठे व अग्रणी असे जल व साहस पर्यटनस्थळ मानल्या जाते. मध्य प्रदेश राज्याचा जलमहोत्सव[१] ज्या ठिकाणी भरविण्यात येतो त्या अनेक ठिकाणांपैकी हे एक आहे.[२]
जलमहोत्सवाची इतर ठिकाणे
मध्य प्रदेशातील ओंकारेश्वरजवळ सैलाना, मंदसौरजवळ गांधी सागर तसेच जबलपूरजवळ सरगी (बरगी?) येथेही अश्याच प्रकारच्या सोयी मध्यप्रदेश पर्यटन विभागातर्फे करण्यात येत आहेत.[२]
येथील सोयी
या जलाशयाच्या पाण्यात जेट स्किईंग, वॉटर झोरबिंग,बनाना राईड, पॅरासेलिंग वगैरे करता येते तसेच, येथील मोकळ्या आकाशात पॅरामोटरिंग, पॅराग्लायडिंग व हॉट एर बलुनचा आनंद घेण्याची व्यवस्था आहे.या व्यतिरिक्त, नर्मदा क्वीन क्रुझची जलाशयातील सफर व तंबूत मुक्काम करून रात्री दुर्बीणीतून आकाशदर्शनही करता येते.[२]
इतर
येथे येणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी स्थानिक कलाकारांचे लोकनृत्य व संगीत, स्थानिक व्यंजने व हस्तकला प्रदर्शन आदी गोष्टीही आहेत.[२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ जलमहोत्सवाची माहिती देणारे खाजगी संकेतस्थळ(इंग्रजी मजकूर) जलमहोत्सव Check
|दुवा=
value (सहाय्य). दिनांक ०५/०१/२०१७ रोजी पाहिले.|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ a b c d लेखक:वंदना मुळे,. तरुण भारत, नागपूर - ई-पेपर-दि. ०५/०१/२०१७-फुलऑन पुरवणी, पान क्र. १ रोमांचने भरलेला जलमहोत्सव Check
|दुवा=
value (सहाय्य). दि. ०५/०१/२०१७ रोजी पाहिले.|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link)
बाह्य दुवे
- जलमहोत्सवाबाबत माहिती देणारे संकेतस्थळ Archived 2016-11-20 at the Wayback Machine.
- मध्य प्रदेश पर्यटन विभागाचे संकेतस्थळावर असलेला जलMahotsav दुवा