'उखळ-धान इ. : धान्याचे वरचे आवरण काढण्यासाठी, उथळ खळग्यासारखे भासणारे कठिण दगडापासुन बनविलेले एक साधे यंत्र.हे कठिण लाकडाचेही असते.
मुसळ-मुटकण्यासाठी(मारण्यासाठी/कुटण्यासाठी) असलेला कठिण लाकडाचा(शिसम/सागवान) सळ(दांडा)
कांडप'/कांडणे-कांड(तुकडे)करण्याची क्रिया (खलबत्ता वापरून वा उखळ-मुसळ वापरून)
जाते- धान्याचे पीठ दळण्यासाठी हाताने गोल फिरवावयाचा गोल व विशिष्ट आकार असलेला एकावर एक ठेवलेला दगड. यात खालचा दगड पक्का असून वरचा फिरत असल्यामुळे त्या दोहोत धान्य दळल्या जात असे. [२]
शिंकाळे-दुध/दुभते/लोणी/दही इत्यादी मांजर वा तत्सम प्राण्यांपासुन वाचविण्यासाठी छपराला दोरीने उंच टांगण्यात आलेली वस्तु
ताटाळे-ताट/झाकण्या ठेवण्यास वापरण्यात येणारे
फुंकणी- एक प्रकारचा पाईपसदृष्य तुकडा. हा चुलीतील लाकडांना जाळ लावण्यास हवा फुंकण्यास वापरीत असत.
भुश्याची शेगडी-लाकडाचा भुसा हे जळण म्हणून वापरून स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी शेगडी
कशेली
कळशी-विहिरीवरून प्यायचे पाणी आणावयाचे एक अरुंद तोंडाचे व काठ असलेले सुमारे ५-८ लिटर क्षमतेचे पाण्याचे भांडे
निखारे-कोळसा पेटल्यावर तयार होणारे व धग देणारे
कळकणे-आंबट पदार्थ(ताक,दही इत्यादी) पितळेच्या वा काशाच्या(धातुच्या) भांड्यात बराच वेळ ठेवल्याने, त्याच्या आम्ल गुणांमुळे त्याची धातुशी प्रक्रिया होऊन तो पदार्थ दुषित होण्याची घडणारी रासायनिक क्रिया.
वाढप
ताटली
ताम्हण, ताम्हन
वरणभात (एकात वरण एकात भात असं जोड भांडं. वर दांडा)
वेळणी (ताटली)
तसराळे,
डाव
ओगराळे,-कणिक/धान्य साठविलेल्या डब्यातुन ते काढण्यास वापरण्यात येणारा एक मोठया 'डावासारखी' वस्तु.
'भातवाढणं' 'भाताचा हात', 'थप्पी', थापी
भांडे
मोदकपात्र
फुलपात्र
फिरकीचा तांब्या
* फिरकीचा तांब्या-प्रवासात पिण्याचे पाणी नेण्यासाठी सुमारे २ लिटर क्षमतेचा, पेचाचे झाकण व कडी असलेला तांब्या(लोटी)
इतर
'सारणी'
'दोमुखं'
'निवणी'
'अडणी'
दुधाणी
मेशरं/मशेरकं
शेरकं/दशेरकं
निठवं
ओयरा
थावर
टोप-एक प्रकारचे उभट भांडे-याचा आकार इंग्रजी सैनिकाच्या टोपासारखा असतो म्हणून हे नाव.
रोवळी (बुरडाची)
बोगणी
भगुलं
सालकाढणं-आंब्याची/फळांची/फळभाज्यांची साल काढण्यासाठी वापरण्यात येणारे एक प्रकारचे साधे यंत्र.पूर्वी तळहातात मावण्याजोग्या शिंपल्यांना खोलगट भागात छिद्र पाडून त्याद्वारेपण साल काढता येत असे.
कणगी-शेतीतील धान्य मोठ्या प्रमाणात साठविण्यासाठी वापरण्यात येणारी खोली.
कलथा / उलथणं / काविलथा
खलबत्ता
खलबत्ता
सांडशी
बंब-आंघोळीसाठी गरम पाणी लाकडे/जळण वापरून तापविण्यास वापरण्यात येणारा तांब्याचा सध्याच्या बॉयलरसदृष्य पण सुमारे २०-२५ लिटर पाणी क्षमतेचा बंब.
तांब्याचा हंडा
हंडा - पाणी ठेवण्यास वापरण्यात येणारे एक धातूचे पात्र.
चरवी- पाणी ठेवण्यास वापरण्यात येणारे एक हंड्या पेक्षा लहान पात्र.
गडु=घडवा=तांब्या- हंड्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी हा उपयोगी पडतो.
कोनाडा-खोलीच्या सर्व कोपऱ्यात, उजेडासाठी पणती/फुटकळ वस्तु ठेवण्यास करण्यात आलेली भिंतीतील खाच.
तबक-पान,सुपारी,काथ,चुना ई. वस्तु ठेवण्यास वापरण्यात येणारी एक ताटसदृष्य वस्तु
दिवालगिरी-भिंतीवरच्या खिळ्यास सहज अडकविता येणारी,केरोसिन हे जळण म्हणून वापरून उजेड देणारी वस्तु.
रोळी- तांदुळाचा भात करण्यापुर्वी ते 'रोळुन', असल्यास, त्यातील खडे वेगळे करण्यासाठी वापरण्यात येणारे पात्र.
पेव-शेतीतील निघालेले धान्य उंदिर/किडा/मुंग्यांपासुन बचाव करण्यासाठी, बांसापासुन केलेल्या मोठ्या पेटाऱ्यास शेणाने लिंपून, खोल खड्डा करून ते ठेवण्यास करण्यात आलेली जमिनीखालील जागा.
आढे - बहुदा माजघरात,बांबू अथवा पाट्या वापरून, त्यावर माती लिंपून तयार केलेले एक प्रकारचे सिलिंग(ceiling).त्याने छपराची उष्णता खाली खोलीत येण्यास प्रतिबंध होत असे. त्याने माजघर/ आढे असलेली खोली थंड रहात असे. आढ्यावर कधीतरी वर्षातून क्वचितच एक-दोनदा लागणाऱ्या वस्तू, मोठी भांडी इत्यादी वस्तू ठेवल्या जात असत.
स्त्री कुंकुपेटी वापरून कुंकु लावतांनाकुंकुपेटी- विवाहीत स्त्रियांचा साजश्रुंगार करण्यासाठी कुंकु,हळद, फणी,आकडे,गंगावन,रीबीन इत्यादी सामान वेगवेगळे ठेवण्यास खाणे असणारी आणि झाकणाच्या आतील बाजूस आरसा असणारी लाकडी पेटी(आजकालच्या मेकअप बॉक्सची पुर्वज)
चंची-कमरेला नेसलेल्या वस्त्रास खोचण्यास येणारी, बंदांच्या साहाय्याने तोंड उघड-बंद करू शकणारी,चिल्लर पैसे,महत्त्वाच्या जडी-बुटी,सटर-फटर वस्तु ठेवण्यास उपयोगी पडणारी जाड कापडाची, अस्तर असणारी व कप्पे असणारी छोटी पिशवी.
पोहरा- आड/ विहिरीतुन दोराच्या साहाय्याने पाणी काढण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडाची, गोल बुडाची, लोखंडी बादलीसारखी वस्तु. याचे बुड गोल असल्यामुळे ती ताबडतोब पाण्यात बुडत असे.विहिरीच्या पाण्यात डुंबणारा/पोहणारा तो 'पोहरा'.याची क्षमतासुमारे १०-१२ लिटर असते.'आडातच (पाणी) नाही तर पोहऱ्यात कुठुन येणार' ही म्हण पोहरा या शब्दावरूनच तयार झाली आहे.