हजर बाजार
हजर बाजार[१] (इंग्लिश: Spot market, स्पॉट मार्केट) किंवा रोकड बाजार (इंग्लिश: Cash market, कॅश मार्केट ) म्हणजे तात्काळ पोचवणीसाठी (बटवड्यासाठी) उपलब्ध असलेल्या वित्तीय संलेखांचा किंवा वस्तूंचा व्यापार चालणारा सार्वजनिक वित्तीय बाजार होय. पोचवणीच्या दृष्टीने हा वायदे बाजारापेक्षा भिन्न असतो, कारण वायदे बाजारात भविष्यातील एखाद्या दिवशी पोचवणी अभिप्रेत असते; तर हजर बाजार तात्काळ पोचवणीच्या सौद्यांवर चालतो. हजर बाजाराच्या स्वरूपाचे दोन प्रकार आहेत :
- सुसंघटित बाजार. उदा.: रोखे बाजार.
- गल्ल्यावरील सौदे, अर्थात ओव्हर द काउंटर (ओटीसी).
हजर बाजार व्यवहार घडण्यासाठी आवश्यक तेवढ्या पायाभूत सुविधा असलेल्या कोणत्याही ठिकाणी चालू शकतो. सध्या वित्तीय संलेखांचे सौदे होणारे बरेचसे हजर बाजार आंतरजालावर चालतात.
संदर्भ व नोंदी
- ^ अर्थशास्त्र परिभाषा कोश. p. ६३१.