हंबली
हंबली (Hanbali) हा इस्लामच्या सुन्नी पंथाचा उपपंथ आहे. इमाम हंबल यांच्या विचारांना मानणारा मोठा मुसलमानांचा वर्ग आहे. ते स्वतःला हंबली म्हणतात. सौदी अरेबिया, कतार, कुवैत आणि इतर आखाती देशांसह आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये यांची संख्या मोठी आहे. सौदी अरेबियातील सरकारी शरियत अर्थात नियम हंबलच्या नियमांवर आधारित आहे.