Jump to content

हंगरगा

       

  ?हंगरगा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरनायगाव
जिल्हानांदेड जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

हंगरगा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक गाव आहे.

पार्श्वभूमी

हंगरगा हे गाव नांदेड जिल्ह्यातील नायगाव या तालुक्यात आहे.

                  हे गाव नायगाव पासून पूर्वेस 9 किलोमीटर अंतरावर आहे,हे गाव खूप छोटेसे खेड आहे,ह्या गावात एक ग्रामपंचायत आहे त्यात 7 सदस्य आहेत.

                   हंगरगा या गावाला बाजार पेठ नाही,ह्या गावातील व्यक्तींना बाजार करण्यासाठी नायगावला जावे लागते.

शिक्षण :

              हंगरगा हे गाव एक खेड असल्यामुळे एकच शाळा आहे,ते पण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे या शाळेत 5 वी पर्यंत शिक्षण दिले जाते.पुढील शिक्षणासाठी मुलांना बाहेर गावी जावे लागते.

धार्मिक स्थळ :

                     हंगरगा या गावी एक हनुमान मंदिर आहे व ते खूप सुंदर पद्धतीने बांधलेले आहे.

       ह्या गावात एक श्री कृष्ण मंदिर आहे ते पण मंदिर खूप चांगले आहे.

  हंगरगा या गावाच्या दोन बाजूला दोन छोटे तळे आहेत.

        या गावाच्या मध्ये भागी एक विहीर आहे या विहिरीचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बुडा पर्यंत पायऱ्या आहेत.

      हंगरगा या गावातील लोक प्रामुख्याने शेती करतात शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात, येथील शेतकरी प्रामुख्याने शेत सोयाबीन,कापूस,मूग,उडीद,हरभरा हे पीक घेतात.

      ह्या गावाला जायचे असेल तर रिक्षा किंवा जीप ने जावे लागते.

हंगरगा या गावातील झालेले भांडण हे गावातल्या गावात मिटवले जाते त्या साठी एक तंटामुक्ती अध्यक्षाची निवड केलेली आहे.

                        या गावांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात,ते सर्व लोक एकमेकांसोबत प्रेमाने वागतात, या गावातील लोक एकमेकांच्या सूख दुःखात सहभागी होतात.

                         हंगरगा या गावातील लोक गुण्यागोविंदाने,आनंदाने जीवन जगतात.

भौगोलिक स्थान

हवामान

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate