Jump to content

ह.वि. सरदेसाई

डॉ. हणमंत विद्याधर सरदेसाई (ह.वि. सरदेसाई) ( १० एप्रिल १९३३, मृत्यू :१५ मार्च २०२०, पुणे []) हे मराठी डॉक्टर व लेखक होते. ते सातत्याने वृत्तपत्रांतून आरोग्यविषयीचे लेख लिहीत. ते पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजात प्राध्यापक होते.मुंबईत १९५५ साली ते एमबीबीएस आणि १९५८ मध्ये एमडी झाले. उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. प्रिव्हेंंटिव्ह आणि फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये प्रावीण्यासह व स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्रात त्यांना परीक्षअंती सुवर्णपदक मिळाले होतं. न्यूरोलोजी विषयात एमडी करून ते पुण्यात स्थाईक झाले. वैद्यकीय विषयाशी निगडित पुण्यातील अनेक संस्थांचे ते अध्यक्ष, सदस्य होते.त्यांनी भरपूर लेखन केले. त्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारे 'निरामय जीवनाचे पथदर्शक-डॉ. ह.वि. सरदेसाई' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

डाॅ. ह.वि. सरदेसाई हे श्रेष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ असून सोप्या भाषेत वैद्यकीय ज्ञानाचा प्रसार करणारे लेखक होते. वैद्यकीय ज्ञान सोप्या भाषेत पोहोचविण्यासाठी त्यांनी विपुल लेखन केले. ‘घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती’ हे त्यांचे पुस्तक गाजले.

विद्यार्थिप्रिय प्राध्यापक असा त्यांचा लौकिक होता. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. डॉ. सरदेसाई यांना वेगवेगळ्या रूपांतील गणेशमूर्ती जमा करण्याचा छंद होता. त्यांच्याकडे चित्र आणि शिल्प रूपातील गणपतींचा संग्रह होता. प्रखर बुद्धिमत्तेच्या जोडीला असलेले संवादकौशल्य, रुग्णांविषयी वाटणारा उमाळा आणि रुग्णांना आदराने वागविण्याच्या स्वभावाच्या बळावर डॉ. सरदेसाई यांनी जवळपास सहा दशकांहून अधिक काळ वैद्यकीय व्यवसाय केला. त्यांनी केवळ संवाद साधल्यानंतर रुग्णाचा निम्मा आजार बरा व्हायचा.

लोकांनी त्यांना दिलेली ‘धन्वंतरी’ ही उपाधी त्यांनी सार्थ केली.

डाॅ.सरदेसाई यांनी लिहिलेली पुस्तके

  • Until Medical Help Arrives (सहलेखिका - सरिता भावे)
  • आपण आणि आपली प्रकृती
  • आरोग्य आणि जीवनशैली
  • आरोग्यदर्पण
  • आरोग्य समस्या आणि उपचार
  • आरोग्य सर्वांसाठी
  • आरोग्याचा झरोका
  • आरोग्याची गुरुकिल्ली
  • आरोग्याची त्रिसूत्री
  • आरोग्याची मूलतत्त्वे
  • आरोग्याची वाटचाल
  • आरोग्याची शंभर सूत्रे
  • आरोग्याची सुखद पायवाट
  • आहार आणि आरोग्य
  • औषधाविना आरोग्य
  • The Key To Good Health (इंग्रजी)
  • घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती
  • जीवन शैली - आरोग्य
  • डॉक्टर भेटेपर्यंत - आरोग्य
  • धन्वंतरी घरोघरी (सहलेखक - डॉ. अनिल गांधी)
  • निरामय जीवनाचे पथदर्शक
  • प्रकृतीस्वास्थ्य, दिनचर्या
  • Primer Of Health (इंग्रजी)
  • मधुमेहाची ओळख (सरदेसाई व अन्य पाच सहलेखक)
  • मानसिक त्राण, वार्धक्य
  • Lifestyle (इंग्रजी)
  • Some Health Problems And Their Treatment (इंग्रजी)

डॉ. ह.वि. सरदेसाई यांचे विविध नियतकालिकांतून आलेले आणि गाजलेले लेख

  • गडगडतंय पोटात

डॉ. सरदेसाई यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके

  • डॉ.ह. वि .सरदेसाई आत्मकथन आणि त्यांची निदानशैली (लेखक - डॉ. जगमोहन श. तळवलकर आणि वा.ल. मंजूळ)

डॉ. ह.वि. सरदेसाई यांना मिळालेले पुरस्कार

  • पुण्यभू्षण पुरस्कार (२०११)
  • प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१६)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे पुण्यात निधन". Maharashtra Times. 2020-03-16 रोजी पाहिले.[permanent dead link]