Jump to content

स्वित्झर्लंड क्रिकेट संघाचा लक्झेंबर्ग दौरा, २०२२

स्वित्झर्लंड क्रिकेट संघाचा लक्झेंबर्ग दौरा, २०२२
लक्झेंबर्ग
स्वित्झर्लंड
संघनायकजूस्ट मेस फहीम नझीर
२०-२० मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाटिमोथी बार्कर (४९)‌ फहीम नझीर (७५)
सर्वाधिक बळीविल्यम कोप (४)
अमित धिंग्रा (४)
अर्जुन विनोद (६)

स्वित्झर्लंड क्रिकेट संघाने जून २०२२ मध्ये दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी लक्झेंबर्गाचा दौरा केला. दोन्ही देशांमधील ही पहिली द्विपक्षीय मालिका होती. पहिला सामना लक्झेंबर्गने १८ धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडने ७८ धावांनी विजय मिळवत ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. सदर मालिका २०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी खेळवली गेली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

११ जून २०२२
१०:००
धावफलक
लक्झेंबर्ग Flag of लक्झेंबर्ग
१३३/७ (२० षटके)
वि
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
११५/७ (२० षटके)
टिमोथी बार्कर ३२ (२५)
अर्जुन विनोद ३/१६ (४ षटके)
ऐडन अँड्र्युज ३०* (३३)
अमित धिंग्रा २/२६ (४ षटके)
लक्झेंबर्ग १८ धावांनी विजयी.
पियरे वर्नर क्रिकेट मैदान, वॉल्फरडांगे
पंच: रिचर्ड एम्स (बे) आणि श्री कोल्ला (ल)
  • नाणेफेक : लक्झेंबर्ग, फलंदाजी.
  • लक्झेंबर्ग आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • स्वित्झर्लंडने लक्झेंबर्गमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • लक्झेंबर्गने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये स्वित्झर्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • शिव गिल, अनूप ओर्सू (ल) आणि फहीम नझीर (स्वि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

११ जून २०२२
१५:००
धावफलक
स्वित्झर्लंड Flag of स्वित्झर्लंड
१५८/९ (२० षटके)
वि
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
८० (१५.१ षटके)
फहीम नझीर ६५ (४५)
विल्यम कोप ३/३९ (४ षटके)
टिमोथी बार्कर १७ (१४)
अर्जुन विनोद ३/१७ (४ षटके)
स्वित्झर्लंड ७८ धावांनी विजयी.
पियरे वर्नर क्रिकेट मैदान, वॉल्फरडांगे
पंच: श्री कोल्ला (ल) आणि स्टीव ट्रिप (बे)
  • नाणेफेक : लक्झेंबर्ग, क्षेत्ररक्षण.
  • स्वित्झर्लंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये लक्झेंबर्गवर पहिल्यांदाच विजय मिळवला.