Jump to content

स्वाहिली विकिपीडिया

स्वाहिली विकिपीडिया
स्वाहिली विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषास्वाहिली
मालकविकिमीडिया फाउंडेशन
निर्मितीजिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवाhttp://sw.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

स्वाहिली विकिपीडिया (स्वाहिली : Wikipedia ya Kiswahili) ही विकिपीडियाची स्वाहिली भाषेतील आवृत्ती आहे. हे नायजर-कॉंगो किंवा निलो-सहारन भाशांमधील विकिपीडियाची सर्वात मोठी आवृत्ती आहे, या नंतर योरूबा विकिपीडियाचा क्रमांक आहे.[]

२७ ऑगस्ट २००६ रोजी छोट्या विकिपीडिया भाषेच्या आवृत्तीच्या संघर्षांवर इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्यून आणि न्यू यॉर्क न्यूजडे यांनी लेखात या विकिपीडियाचा उल्लेख केला होता.[] २००९ मध्ये, गूगल ने स्वाहिली विकिपीडियामध्ये लेखांच्या निर्मितीस प्रायोजन केले. [] २० जून २००९ रोजी स्वाहिली विकिपीडियाने त्याच्या मुख्य पृष्ठास मोठा बदल केला. एप्रिल २०२१ मध्ये या विकिपीडियामध्ये सुमारे ६१,००० लेख होते, ज्यामुळे ते ८७ व्या क्रमांकाचे विकिपीडिया बनले.[]

जानेवारी २०२१ पर्यंत इंग्रजी आवृत्तीनंतर अनुक्रमे १४% आणि ४% पृष्टभेटींसह टांझानिया आणि केन्या मधील स्वाहिली विकिपीडिया हे दुसरे सर्वाधिक लोकप्रिय विकिपीडिया आहे.

संदर्भ

  1. ^ "List of Wikipedias by language group". wikimedia.org.
  2. ^ Building Wikipedia in African languages, by Noam Cohen, International Herald Tribune, August 27, 2006.
  3. ^ "Hungry for New Content, Google Tries to Grow Its Own in Africa". nytimes. January 24, 2010. October 14, 2014 रोजी पाहिले.
  4. ^ "List of Wikipedias". wikimedia.org.

बाह्य दुवे