स्वामी राम
श्री स्वामी राम (इ.स. १९२५ - इ.स. १९९६) हे एक भारतीय योगी होते. पाश्चात्य वैज्ञानिकांना आपला आणि आपल्या क्षमतांचा अभ्यास करू देण्यास परवानगी देणाऱ्या मोजक्या योग्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. १९६० च्या दशकात मेनिंगर क्लिनिकमधील वैज्ञानिकांना त्यांनी आपली तपासणी करण्यास अनुमती दिली. हृदयाची गती, रक्तदाब, शरीराचे तापमान नियंत्रित करणाऱ्या प्रक्रिया अनैच्छिक (व्यक्तीच्या ताब्यात नसणाऱ्या) मानल्या जातात; स्वामी रामांचे या प्रक्रियांवर नियंत्रण कसे आहे याचा अभ्यास मेनिंगर क्लिनिकमधील वैज्ञानिकांनी केला.