Jump to content

स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा

स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा

स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा किंवा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (इंग्लिश: Statue of Liberty) ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील लिबर्टी आयलंड वर उभारण्यात आलेली एक वास्तू आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ फ्रान्सकडून अमेरिकेला भेट मिळालेल्या ह्या पुतळ्याचे २८ ऑक्टोबर १८८६ रोजी उद्‌घाटन करण्यात आले. उजव्या हातात स्वातंत्र्याची ज्योत घेऊन उभ्या असलेल्या एका स्त्रीचा हा पुतळा अमेरिकेमध्ये प्रवेश करण्याऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतो.

जुन्या काळात युरोपातून बोटीने अमेरिकेत येणाऱ्या लोकांना अमेरिकेचे पहिले दर्शन स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याद्वारे होत असे. आजही हा पुतळा अमेरिकेतील सर्वात महत्त्वाच्या खुणांपैकी एक मानला जातो.

१५१ फूट उंच असलेल्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याच्या उजव्या हातात ज्योत असून डाव्या हातात पुस्तक आहे. त्यावर ४ जुलै १७७६ ("July IV MDCCLXXVI") ही अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाची तारीख लिहिलेली आहे. पुतळ्याची पाया धरून उंची ३०५ फूट असून पुतळ्याच्या मुकुटात ज्या ७ खिडक्या आहेत, त्या जगातील ७ खंड दर्शवतात. उजव्या हातातील ज्योत प्रकाश दर्शवते तर डाव्या हातातील पुस्तक ज्ञान दर्शवते. १८७० मध्ये जुलेस जोसेफ लेफेब्व्रेचे 'ला वेरेत' हे चित्र 'स्वातंत्र्यदेवतेचा पुतळ्याशी' मिळतेजुळते आहे. २.४ मिलिमीटर जाडीच्या तांब्याच्या पत्र्यापासून हा संपूर्ण पुतळा बनवलेला असून आतून त्याला लोखंडाच्या/ स्टीलच्या पट्ट्यांचा आधार दिला आहे.

पुतळ्याचा तपशील

वर्णन[]इंग्लिश एककमेट्रिक एकक
तांब्याच्या पुतळ्याची उंची151 फूट १ इंच४६ मीटर
पायथ्यापासून मशालीच्या ज्योतीची उंची305 फूट १ इंच९३ मीटर
पायापासून डोक्यापर्यंत उंची111 फूट 1 इंच३४ मीटर
शीर16 फूट 5 इंच५ मीटर
तर्जनी8 फूट 1 इंच2.44 मीटर
दुसऱ्या जोडाचा परीघ3 फूट 6 इंच1.07 मीटर
हनुवटी ते शिरोभाग17 फूट 3 इंच5.26 मीटर
शिराची जाडी10 फूट 0 इंच3.05 मीटर
दोन डोळ्यांतील अंतर2 फूट 6 इंच0.76 मीटर
नाक4 फूट 6 इंच1.48 मीटर
उजवा हात42 फूट 0 इंच12.8 मी
उजव्या हाताची जाडी12 फूट 0 in3.66 मीटर
मनगट35 फूट 0 in10.67 मीटर
मुख3 फूट 0 इंच0.91 मीटर
चबुतरा89 फूट 0 इंच27.13 मीटर
पायथा65 फूट 0 इंच19.81 मीटर
तांब्याचे वजन60,000 पाउंड27.22 मेट्रिक टन
लोखंडाचे वजन250,000 पाउंड113.4 मेट्रिक टन
एकूण वजन450,000 पाउंड204.1 मेट्रिक टन
तांब्याच्या पत्र्याची जाडी3/32 इंच2.4  मिलिमीटर

गॅलरी

संदर्भ

  1. ^ "Statistics". Statue of Liberty. 2010-07-19 रोजी पाहिले.

बाह्य दुवे