स्वर्णगौरी व्रत
स्वर्णगौरी व्रत हे महिलांचे एक धार्मिक व्रत आहे.कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या प्रांतात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल तृतीया तिथीला महिला हे व्रत करतात. या व्रताला गौरी हब्बा असेही नाव आहे.[१]
महत्त्व
पार्वती देवीच्या पूजेशी जोडले गेलेले हे व्रत आहे. पार्वती एक दिवस आपल्या माहेरी येते आणि दुस्या दिवशी आपल्या घरी म्हणजे कैलास पर्वतावर परत जाते अशी या व्रताच्या मागील धारणा आहे.
स्वरूप
विवाहित महिला वैवाहिक सुखासाठी हे व्रत करतात आणि अविवाहित मुली भावी सुखी आयुष्यासाठी हे व्रत करतात. या दिवशी देवी पार्वतीची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. विवाहित महिलांच्या माहेराहून त्यांच्यासाठी पूजासाहित्य , पोशाख पाठविले जातात. ते परिधान करून महिला देवीची पूजा करतात.[१] पार्वती देवीची मातीची मूर्ती तयार करून तिची पूजा केली जाते. १६ गाठींच्या दोरकाचे पूजन्ही या दिवशी करतात. या व्रतात घरातील सोन्याची, सोन्याच्या दागिन्यांची ही पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे.[२]
हे ही पहा
संदर्भ
- ^ a b DelhiSeptember 9, India Today Web Desk New; September 9, 2021UPDATED:; Ist, 2021 16:03. "Gowri Habba 2021: Date, tithi, puja timings and significance". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-09-13 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ Webdunia. "स्वर्ण गौरी व्रत 11 ऑगस्ट 2021, स्वर्ण गौरी व्रत क्या है, जानिए मुहूर्त,पूजा विधि और उपाय". hindi.webdunia.com (हिंदी भाषेत). 2021-09-13 रोजी पाहिले.