स्वतःविषयी (पुस्तक)
स्वतःविषयी / अनिल अवचट
"...या तऱ्हेचे मोठे लेख प्रसिद्ध झाल्यावर कांही मित्रानी विचारले, "काय आत्मचरित्र लिहितो आहेस वाटतं..?" त्यावर प्रश्न पडला की हे आत्मचरित्र आहे का ? तसेही वाटेना.. 'दहावीचं वर्ष' वाचल्यावर एकाने विचारले, "हे कुठलं साल होतं त्याचा तुम्ही उल्लेखही केला नही". मला तसे करण्याची जरुरीच वाटली नाही. आत्मचरित्र असते तर भोवतीच्या व्यक्ती, तत्कालीन महत्त्वाच्या घटना, एत्यादी सर्व काही दिले असते. घटनाक्रम दिला असता, पण तसा उद्देशच नव्हता. माझ्या परीने मी पूर्वायुष्यात बुडी मारून कांही अनुभव किंवा दृष्टी घेऊन बाहेर येत होतो..."