स्मिता तांबे
स्मिता तांबे (जन्म : ११ मे १९८३) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री आहेत. त्यांनी एकापेक्षा एक : अप्सरा आली, बोल बच्चन, फू बाई फू, अनुबंध, सोनियाचा उंबरा, लाडाची मी लेक गं! इत्यादी दूरचित्रवाणी कार्यक्रमांत भूमिका केल्या आहेत. स्मिता तांबे हिने श्रीमानयोगी, हमीदाबाईची कोठी या मराठी नाटकांत काम केले आहे.