Jump to content

स्मार्ट डस्टबिन

Smart Dustbin

ओळख

डस्टबीन्स (कचरापेटी) म्हणजे लहान प्लास्टिक (किंवा धातू) कंटेनर आहेत जे तात्पुरते आधारावर कचरा साठवण्यासाठी वापरले जातात. कचरा गोळा करण्यासाठी ते बहुधा घरे, कार्यालये, रस्ते, उद्याने इत्यादी ठिकाणी वापरतात.काही ठिकाणी कचरा टाकणे हा एक गंभीर गुन्हा आहे आणि म्हणूनच सार्वजनिक कचरा कंटेनर हा छोटा कचरा टाकण्याचा एकमेव मार्ग आहे.सामान्यत: ओला किंवा कोरडा, न वापरता येणारा कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र डब्यांचा वापर करणे ही सामान्य पद्धत आहे.

या प्रकल्पात, आर्डिनो, अल्ट्रासोनिक सेन्सर आणि सर्वो मोटर वापरून स्मार्ट डस्टबिन नावाची एक सोपी सिस्टीम तयार केली आहे, जिथे डस्टबिनचे झाकण आपोआपच हात न लावता उघडेल.आर्डिनो वापरून स्मार्ट डस्टबिनमागील मुख्य संकल्पना म्हणजे ऑब्जेक्ट डिटेक्शन.

बनवण्याची प्रक्रिया

लागणारे साहित्य

  • आर्डिनो बोर्ड
  • सर्वो मोटार
  • अल्ट्रासॉनिक सेन्सर
  • कनेक्टिंग वायर

साधणे

  • सोल्डरिंग गण
  • वायर कटर
  • कात्री
  • ग्लू गण

सर्किट डायग्राम

Circuit Diagram of Smart dustbin

जोडणी

  • Ultrasonic Sensorची Vcc पिन Arduinoच्या 5Vला लावावी.
  • Ultrasonic Sensorची trig पिन Arduinoच्या पिन 5ला लावावी.
  • Ultrasonic Sensorची echo पिन Arduinoच्या पिन 6ला लावावी.
  • Ultrasonic Sensorची GND आणि Servo Motorची काळी वायर Arduinoच्या GNDला लावावी.
  • Servo Motorची लाल वायर Arduinoच्या 3.3Vला लावावी.
  • Servo Motorची केशरी किंवा पिवळी वायर Arduinoच्या पिन 7ला लावावी.
  • त्यानंतर Arduino IDE सॉफ्टवेर मध्ये प्रोग्राम करून तो USB cableच्या मदतीने Arduino बोर्ड मध्ये घ्यावा.

खर्च

  • आर्डिनो बोर्ड - ५०० रुपये
  • सर्वो मोटार - १८० रुपये
  • अल्ट्रासॉनिक सेन्सर - १७० रुपये
  • वायर - ३५ रुपये
  • एकूण :- ८८५ रुपये

संदर्भ

[]

[]

  1. ^ "Learning While Doing". learningwhiledoing.in. 2020-02-20 रोजी पाहिले.
  2. ^ "Smart Dustbin using Arduino, Ultrasonic Sensor & Servo Motor". Electronics Hub (इंग्रजी भाषेत). 2020-02-20 रोजी पाहिले.