Jump to content

स्पिकिंग पीस (पुस्तक)

स्पिकिंग पीस: विमेन्स वोइसेस फ्रॉम काश्मीर[] हे निबंध, मुलाखती व वैयक्तिक कथानकांचे संकलन असून भारतीय स्त्रीवादी उर्वशी बुटालीया द्वारे संपादित पुस्तक आहे. काली फॉर विमेन द्वारे २००२ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले.

महत्त्वाचा युक्तिवाद

या पुस्तकातील सर्व निबंध किंवा मुलाखती हे काश्मिरी स्त्रियांना (हिंदू किंवा मुस्लिम) विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आणते. एका संकलनाच्या स्वरूपात बघितल्यास हे पुस्तक विविध विषयांवर जसे समुदायाची भूमिका, हिंसा, ओळख, राष्ट्रीयत्व, सुरक्षा, आरोग्य व शांतीचे प्रयत्नावर भाष्य करते. पुस्तकाची प्रस्तावना आपल्याला काश्मीर प्रदेशाबाबत सखोल माहिती तसेच पुढील निबंधांसाठी राजकीय पार्श्वभूमी प्रदान करते.

योगदान

समालोचक कल्पना शर्मा या पुस्तकाला राजकीय दृष्ट्या उपयुक्त व सखोल माहिती देणारे असे मांडते.[] 'आउटलुक' व 'द हिंदू' या इंग्रजी प्रसारमाध्यमांनी सदरच्या पुस्तकाला चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.[]

संदर्भ सूची

  1. ^ ISBN-13: 978-8186706572
  2. ^ "संग्रहित प्रत". 2016-07-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-23 रोजी पाहिले.
  3. ^ http://zubaanbooks.com/shop/speaking-peace-womens-voices-from-kashmir/