Jump to content

स्नेहलता रेड्डी

Snehalata Reddy (es); স্নেহলতা রেড্ডি (bn); Snehalata Reddy (fr); Snehalata Reddy (jv); Snehalata Reddy (ga); Snehalata Reddy (ast); Snehalata Reddy (ca); स्नेहलता रेड्डी (mr); Snehalata Reddy (de); ସ୍ନେହଲତା ରେଡ୍ଡି (or); Snehalata Reddy (sq); Snehalata Reddy (id); Snehalata Reddy (bjn); Snehalata Reddy (nl); Snehalata Reddy (sl); Snehalata Reddy (su); Snehalata Reddy (tet); Snehalata Reddy (min); سنيهالاتا ريدى (arz); ಸ್ನೇಹಲತಾ ರೆಡ್ಡಿ (kn); സ്നേഹലത റെഡ്ഡി (ml); Snehalata Reddy (ace); Snehalata Reddy (bug); Snehalata Reddy (gor); స్నేహలతా రెడ్డి (te); ਸਨੇਹਲਤਾ ਰੈਡੀ (pa); Snehalata Reddy (en); ಸ್ನೇಹಲತಾ ರೆಡ್ಡಿ (tcy); Snehalata Reddy (map-bms); சினேகலதா ரெட்டி (ta) ভারতীয় অভিনেত্রী এবং রাজনীতিবিদ (bn); ناشطه حقوق الانسان من دومينيون الهند (arz); pemeran asal India (id); actriz india (1932–1977) (ast); ഇന്ത്യന്‍ സ്വാതന്ത്ര്യ സമരത്തില്‍ പങ്കെടുത്ത വനിത (ml); Indiaas actrice (1932-1977) (nl); ಸ್ನೇಹಲತಾ ರೆಡ್ಡಿರವರು ತೆಲಗು ಭಾಷೆಯ ಕಲಾವಿದೆ ಮತ್ತು ನಿಮಾ೯ಪಕರು (kn); भारतीय राजकीय क्षेत्रातील महिला आणि अभिनेत्री (mr); భారతీయ నటి మరియు రాజకీయ ఉద్యమకారిని (te); ଭାରତୀୟ ଅଭିନେତ୍ରୀ ଓ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); Indian actress and political activist (en); ممثلة هندية (ar); actores a aned yn 1932 (cy); இந்திய நடிகையும், அரசியல் செயற்பாட்டாளாரும் (ta) Snehalatha Reddy (en)
स्नेहलता रेड्डी 
भारतीय राजकीय क्षेत्रातील महिला आणि अभिनेत्री
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९३२
आंध्र प्रदेश
मृत्यू तारीखजानेवारी २०, इ.स. १९७७
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

स्नेहलता रेड्डी (१९३२ - २० जानेवारी, १९७७) ह्या एक भारतीय अभिनेत्री, निर्माती आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी कन्नड सिनेमा, कन्नड थिएटर, तेलुगु सिनेमा आणि तेलुगु थिएटर मध्ये काम केले होते. बडोदा डायनामाइट प्रकरणात रेड्डी यांना अटक करण्यात आली होती, तसेच आणीबाणीच्या काळात त्यांना ८ महिन्यांहून अधिक काळ तुरुंगवास भोगावा लागला होता. त्या १९६० मधील स्थापित मद्रास प्लेअर्सच्या सह-संस्थापक होत्या. याशिवाय, त्यांनी अ व्यू फ्रॉम द ब्रिज आणि द हाऊस ऑफ बर्नार्डा अल्बा सारख्या विविध नाटकांमध्ये अभिनय, दिग्दर्शन किंवा निर्मिती केली.[] २००३ मध्ये, त्यांचे पती पट्टाभिराम रेड्डी यांनी इन द आवर ऑफ गॉड, श्री अरबिंदोच्या क्लासिक सावित्रीवर आधारित नाटक, सादर केले होते, जे त्यांनी स्नेहलता रेड्डी यांना समर्पित केले.[]

वैयक्तिक आयुष्य

स्नेहलता यांचा जन्म १९३२ मध्ये आंध्र प्रदेश राज्यात ख्रिश्चन धर्मातील एका कुटुंबात झाला. त्यांनी वसाहतवादी इंग्रज राजवटीला कडाडून विरोध केला ज्यात त्यांचे पूर्वायुष्य स्वातंत्र्य लढ्यात बुडून गेली. स्नेहलताचा विवाह कवी आणि चित्रपट दिग्दर्शक पट्टाभी रामा रेड्डी यांच्याशी झाला होता. हे जोडपे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक आणि कार्यकर्ते डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या कार्यासाठी समर्पित होते. यू आर अनंतमूर्ती यांनी लिहिलेल्या आणि त्यांच्या पतीने दिग्दर्शित केलेल्या संस्कार या कन्नड चित्रपटातील भूमिकेमुळे स्नेहलता राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आल्या. या चित्रपटाला १९७० मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. रेड्डी यांचा शेवटचा चित्रपट सोन कंसारी १९७७ साली त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला होता.[] [][] त्यांची मुलगी नंदना रेड्डी ही मानवी हक्क, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या आहे. २०१२ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या बंगलोर स्थित विना-नफा संस्था 'कन्सर्न्ड फाॅर वर्किंग चिल्ड्रन्स' च्या त्या संस्थापक आणि संचालक आहेत.[] नंदना यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या आपल्या आईच्या अनुभवांच्या विविध आठवणी लिहिल्या आहेत.[] नंदन यांचा मुलगा कोनारक रेड्डी एक संगीत कलाकार आहे.

राजकीय सक्रियता

स्नेहलता आणि त्यांचे पती यांनी आणीबाणीविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी इंदिरा गांधीच्या राजवटीच्या आणि आणीबाणीच्या विरोधात भाषणे दिली.[] रेड्डी आणि जॉर्ज फर्नांडिस यांची चांगली मैत्रि होती. २ मे १९७६[][] बडोदा डायनामाइट प्रकरणाचा भाग असल्याबद्दल रेड्डी यांना अटक करण्यात आली. तथापि, अंतिम आरोपपत्रात मात्र स्नेहलताच्या नावाचा उल्लेख नव्हता. केवळ मैत्री असल्याने त्यांना दोषी मानले गेले. बंगळुरू मध्यवर्ती कारागृहात रेड्डी यांना आठ महिने खटल्याशिवाय ठेवण्यात आले, जेथे त्यांचा नियमित छळ केला गेला. गंभीर दमा असूनही त्यांना वेळेवर उपचार दिले गेले नाहीत. ज्यामुळे त्या दोन वेळेस कोमात गेल्या होत्या.[] शेवटी त्यांची प्रकृती बिघडल्याने, अखेरीस १५ जानेवारी १९७७ रोजी पॅरोलवर सोडण्यात आले.[] तीव्र दमा आणि दुर्बल फुफ्फुसाच्या संसर्गामुळे, २० जानेवारी १९७७ रोजी, सुटकेच्या अवघ्या ५ दिवसांनी रेड्डी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.[१०] आणीबाणीच्या पहिल्या हुतात्म्यांपैकी त्या एक आहेत.[११][१२][१३][१४][१५] स्नेहलता ज्या तुरुंगात होत्या त्याच तुरुंगात असलेले मधु दंडवतेही त्यांच्या आठवणीमध्ये लिहितात, "मला रात्रीच्या शांततेत स्नेहलताच्या कोठडीतून किंकाळ्यांचा आवाज ऐकू येत असे".[१६]

कारागृहात असताना, स्नेहलता रेड्डी यांनी एक रोजनिशी लिहिली होती जी १९७७ मध्ये कर्नाटक मानवाधिकार समितीने ए प्रिझन डायरी नावाने प्रकाशित केली होती. २०१९ मध्ये तिच्या डायरीवर आधारित एक माहितीपट तयार करण्यात आला होता.[१७]

संदर्भ

  1. ^ a b c Aditi De (1 December 2003). "A Savitri for Sneha". The Hindu. 31 March 2004 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 July 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Snehalata Reddy". IMDb.
  3. ^ "In the Hour of God: Play in tribute to Snehalata Reddy at Chowdaiah Memorial Hall, Bangalore".
  4. ^ "Bangalore NGO among nominees for Nobel peace prize |". Citizen Matters, Bengaluru (इंग्रजी भाषेत). 19 February 2012. 13 January 2020 रोजी पाहिले.
  5. ^ Reddy, Nandana (27 June 2015). "A daughter remembers". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 13 January 2020 रोजी पाहिले.
  6. ^ a b "Fearless, Compassionate And Martyr: The Story of an Actress Who Took on The Emergency". The Better India (इंग्रजी भाषेत). 25 June 2018. 13 January 2020 रोजी पाहिले.
  7. ^ Ramachandra Guha (2011). India After Gandhi: The History of the World's Largest Democracy. p. 506. ISBN 978-0330540209.
  8. ^ "इमरजेंसी में इस एक्ट्रेस को जाना पड़ा था जेल, अटल बिहारी वाजपेयी ने सुनाई थी दर्दनाक दास्तां". Jansatta.
  9. ^ Khajane, Muralidhara (29 June 2015). "Celluloid's two-pronged response to Emergency". The Hindu.
  10. ^ Guha, Ramachandra (August 2007). India After Gandhi: The History of The World's Largest Democracy. HarperCollins. p. 504. ISBN 9780230016545.
  11. ^ A Prison Diary. Snehalata Reddy Human Rights Committee, Karnataka State, 1977 -. 1977. pp. 15–22.
  12. ^ Michael Henderson (1977). Experiment with untruth: India under emergency. South Asia Books. p. 48,51. ISBN 0901269344.
  13. ^ Himmat - Volume 13, Issues 1-26. 1976. p. 180. 27 June 2014 रोजी पाहिले.
  14. ^ Scheffler, Judith A. (2002). Wall Tappings: An International Anthology of Women's Prison Writings, 200 to ... edited by Judith A. Scheffler. p. 311. ISBN 9781558612730. 27 June 2014 रोजी पाहिले.
  15. ^ "When friends disappeared". The Hindu. 2 July 2000. 29 June 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  16. ^ Madhu Dandavate (2005). Dialogue with Life. p. 89. ISBN 9788177648560.
  17. ^ "'Prison Diaries': An intimate documentary on anti-Emergency activist Snehalatha Reddy". The News Minute (इंग्रजी भाषेत). 31 December 2019. 24 June 2021 रोजी पाहिले.

बाह्य दुवे