Jump to content

स्त्री साहित्य संमेलन

  • साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात १२-१२-२०१५ ते १३-१२-२०१५ या काळात एक स्त्री साहित्य संमेलन पुण्यात टिळक रोडवरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात भरले होते. संमेलनाध्यक्षा लेखिका प्रतिभा रानडे होत्या.
  • श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीतर्फे २९ सप्टेंबर २०१३ रोजी कष्टकरी स्त्रियांचे पहिले स्त्री साहित्य संमेलन चंदगड येथे भरले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नामवंत लेखिका प्रतिमा जोशी होत्या. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. गेल ऑम्वेट यांच्या हस्ते झाले होते. आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष होत्या.


हे सुद्धा पहा :