Jump to content

स्ट्रेप्टोकोकल फॅरिन्जायटिस

स्ट्रेप्टोकोकल फॅरिन्जायटिस
----
A set of large tonsils in the back of the throat covered in white exudate
स्ट्रेप्टोकोकल फॅरिन्जायटिस चा एक १६ वर्षीय रुग्ण.
ICD-10 J02.0
ICD-9034.0
DiseasesDB12507
MedlinePlus000639
eMedicinemed/1811

स्ट्रेप्टोकोकल फॅरिन्जायटिस, स्ट्रेप्टोकोकल टॉन्सिलायटिस किंवा स्ट्रेप्टोकोकल सोअर थ्रोट (या सगळ्याला मिळून ’स्ट्रेप थ्रोट’ असे म्हणतात) हा ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकल संसर्ग[] संसर्गामुळे होणारा एक प्रकारचा घशाचा विकार आहे. त्याचा परिणाम घशाची पोकळी, घशातल्या गाठी आणि शक्यतो स्वरयंत्रावरही होतो. ताप, घसा येणे, आणि स्वरयंत्रावर आलेली सूज ही याची लक्षणे आहेत. या आजारामुळे ३७% मुलांचे [] आणि ५-१५% मोठ्यांचे घसे बसतात.[]

'स्ट्रेप थ्रोट' हा एक संसर्गजन्य आजार आहे. रुग्णाच्या निकटच्या सहवासात आल्याने तो पसरतो. घशात वाढत असलेया जंतूंची तपासणी केल्यानंतर या आजारचे ठोस निदान करता येते. पण, प्रत्येक वेळी याची गरज नसते. लक्षणे बघूनही औषधोपचार सुरू करता येतात. ज्या ठिकाणी 'स्ट्रेप थ्रोट' असण्याची दाट शक्यता आहे, किंवा तसे ठोस निदान झाले आहे, तिथे प्रतिजैविके देऊन रोगाची पुढची गुंतागुंत थांबविता येते आणि त्यामुळे लवकर बरेही वाटू लागते.[]

लक्षणे

घसा बसणे, ३८ डिग्री सेल्सियसपेक्षा( ३८ °से (१०० °फॅ) ) जास्त ताप, घशाच्या गाठींवर झालेला पू आणि स्वरयंत्रावर आलेली मोठी सूज [] ही स्ट्रेप्टोकोकल फॅरिन्जायटिसची ठराविक लक्षणे आहेत. अजून काही लक्षणे म्हणजे: डोकेदुखी, मळमळ, उलट्या, उदरात कळ उठणे,[] अंग दुखणे,[] चट्टा उठणे किंवा टाळूला बाधा होणे. टाळूला बाधा होणे हे अतिशय विरळ, पण निश्चित असे लक्षण आहे.[] याचा रोगजंतूंनी शरीरात प्रवेश मिळविल्यानंतर प्रत्यक्ष रोगाचा आरंभ होईपर्यंतचा काळ हा एक ते तीन दिवस असतो.[], जर ताप नसेल, पण डोळे येणे, घसा बसणे, सर्दी वाहणे किंवा अल्सर होणे हे असेल, तरी तो स्ट्रेप थ्रोट असण्याची शक्यता कमी आहे.[]

कारणे

ग्रुप ए बीटा-हेमोलायटिक स्ट्रेप्टोकोकस (लघुनाव: गॅस,इंग्रजी:GAS.[] या जंतूंमुळे स्ट्रेप थ्रोटची लागण होते. ग्रुप ए बीटा-हेमोलायटिक स्ट्रेप्टोकोकस नसलेले जंतू आणि फ्यूजोबॅक्टेरियम यांमुळे देखील घशाचे विकार होऊ शकतात. .[][] बाधित व्यक्तीच्या निकटच्या सहवासाने अथवा स्पर्शाने या आजाराचा प्रसार होतो. त्यामुळे गर्दीची ठिकाणे, जसे की लष्करी ठाणी अथवा शाळा इथे या रोगाचा प्रसार वेगाने होतो.[][] असेही संशोधन झाले आहे की धुळीत असलेले वाळलेले सूक्ष्मजंतू हे संसर्गजन्य नसतात, परंतु टूथब्रशसारख्या वस्तूंवर ओलसर सूक्ष्मजंतू हे पंधरा दिवसांपर्यंत टिकून राहू शकतात.[] एकही लक्षण दिसत नसलेल्या लहान मुलांच्या घशात सुमारे १२% गॅसचे सूक्ष्मजंतू असू शकतात. []

निदान

सुधारित सेंटॉर निकष
गुणस्ट्रेप्सची शक्यताव्यवस्थापन
१ किंवा कमी<१०%करणे जरुरी नाही
११-१७%प्रतिजैविके, कल्चर वर आधारित किंवा RADT
२८-३५%
४ किंवा ५५२%Empiric antibiotics

जे लोक घशाच्या विकाराने आजारी आहेत त्यांच्या व्यवस्थापनासाठी सुधारित सेन्टॉर निकष Centor criteria वापरले जाऊ शकतात. त्यामुळे पाच विविध निकषांच्या आधारे स्ट्रेप्टोकोकल संसर्ग झाला आहे की नाही हे दर्शविले जाऊ शकते.[]

प्रत्येक निकषासाठी एक गुण दिला जातो:[] १) खोकल्याचा अभाव २) सूज आलेल्या अथवा लालसर दिसणाऱ्या लसिका ३) ताप (३८ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त) >३८.० °से (१००.४ °फॅ) ४) घशाच्या गाठींवर पू किंवा सूज ५) पंधरा वर्षापेक्षा कमी वय (जर वय ४४ वर्षांपेक्षा जास्त असेल, तर एक गुण वजा केला जातो)

तथापि, ’द इन्फेक्शियस डिसिझ सोसायटी ऑफ अमेरिका’ ही प्रायोगिक औषधोपचारांच्या विरोधात आहे आणि त्यांच्या मते रोगाचे निदान झाल्यावर प्रतिजैविके देणे हेच योग्य औषध आहे.[] तीन वर्षाच्या आतल्या बालकांसाठी तपास करण्याचीही गरज नाही कारण, एखाद्या मोठ्या भावंडाला जर ग्रुप ए स्ट्रेप आणि संधीवाताचा ताप हे दोन्ही आजार झाले असतील, तरच हे आजार त्यांच्यात आढळतील, अथवा हे आजार त्यांच्यात अतिशय अभावाने आढळतात.[]

प्रयोगशाळेत परिक्षा

घशात असलेल्या सूक्षमजंतूंची तपासणी करणे हा स्ट्रेप्टोकोकल फॅरिन्जायटिसचे निदान करण्याचा सर्वोत्तम मार्ग [] आहे. ९०-९५% वेळा या तपासणीने अचूक निदान होते.[] ’रॅपिड स्ट्रेप टेस्ट’ (रॅपिड ॲन्टिजेन डिटेक्शन टेस्टिन्ग किंवा RADT असेही म्हणतात) या नावाची देखील एक परिक्षा केल्या जाऊ शकते. ’रॅपिड स्ट्रेप टेस्ट’ ही लवकर होते, पण तिची अचूकता ७०% पर्यंत असून sensitivity सांख्यिकी परिभाषेत ती घशातील जंतूंच्या तपासणीच्या तुलनेत specificity ९८% अचूक असते.[]

निदानाबद्दल संदेह असल्यास, घशातील रोगजंतूंची तपासणी अथवा RADT आणि आजाराची लक्षणे दोन्ही मिळून एक निश्चित निदान होऊ शकते.[१०] मोठ्या माणसांमध्ये जर RADTची परिक्षा नकारात्मक आली, तर आजार नाही असे निदान करता येऊ शकते. लहान मुलांमध्ये मात्र घशातील रोगजंतूंची तपासणी सुचवली गेली आहे.[] कोणतेही लक्षण न दिसणाऱ्या व्यक्तींनी तपासणी करून घ्यायची आवश्यकता नाही, कारण लोकसंख्येमधील एक विवक्षित टक्के लोक कोणताही हानिकारक परिणाम न दाखवताही स्ट्रेप्टोकोकल सूक्ष्मजंतूचे वाहक असतातच.[१०]

भिन्न रोगनिदान

स्ट्रेप्टोकोकल फॅरिन्जायटिसची लक्षणं आणि शरीरात दिसणारी इतर लक्षणं एकसारखीच असल्यामुळे चिकित्सालयात त्याचं निदान होणं अवघड असते.[] खोकला, सर्दी, हगवण, डोळे येणं, आणि त्या बरोबर ताप आणि घसादुखी ही लक्षणं स्ट्रेप थ्रोटपेक्षाही साध्या घसादुखीची असू शकतात []मोनोन्यूक्लिओसि नावाच्या आजारात घशाच्या गाठींवर सूज, लासिका लाल होणे, घशाला सूज आणि ताप ही लक्षणं दिसतात.

प्रतिबंध

जर सतत घशाचे आजार होत असतील (वर्षातून तीन पेक्षा जास्त वेळा) तर घशाच्या गाठी काढून टाकण्याची शस्त्रक्रीया हा सर्वात वाजवी प्रतिबंध आहे Tonsillectomy [११] परंतु यातून मिळणारे फायदे तसे कमी असून कितीही उपचार केले तरीही आजाराची वारंवारताही कमी होताना दिसते.[१२][१३] घशाचे सतत विकार होणारा मनुष्य, ज्याची तपासणी करता ’गॅस’चे जंतू आढळतात, तो ’गॅस’चा वाहक असण्याची शक्यता असते.[] जे लोक या आजाराच्या जंतूंच्या सान्निध्यात आलेले आहेत, पण ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, अशांना या आजारची औषधे देणे योग्य नाही.[] असे लोक जे केवळ ’गॅस’चे वाहक आहेत, त्यांनाही औषधे देणे गरजेचे नाही, कारण या आजाराचा प्रसार आणि त्यातून उद्भवणारी गुंतागुंत ही तुलनेने कमी तीव्रतेची असते.[]

औषधोपचार

कोणतेही औषधोपचार केले नाहीत, तरी स्ट्रेप्टोकोकल फॅरिन्जायटिस काही दिवसांनी आपोआप बरा होतो.[] प्रतिजैविके देऊन आपण आजाराची तीव्रता १६ तासांनी कमी करू शकतो .[] प्रतिजैविके देण्याचे प्राथमिक कारण हे अशा आजारातुन उद्भवणारे र्ह्यूमॅटिक फीव्हर rheumatic fever आणि रेट्रोफॅरिन्जायटल ॲबसेस retropharyngeal abscess हे आजार रोखणे अथवा कमी करणे हे असतं.[] आजार उद्भवल्याबरोबर लगेच प्रतिजैविके दिली, तर साधारण ९ दिवसात त्यांचा चांगला परिणाम दिसू लागतो.[]

वेदनाशामक औषधे

पॅरॅसिटॅमॉल (acetaminophen) आणि स्टेरॉईड्ज नसलेली वेदनाशामक औषधे non-steroidal anti-inflammatory drugs (NSAIDs) देऊन स्ट्रेप थ्रोटच्या वेदना कमी करता येतात.[१४] लिडोकेन देखील उपयुक्त ठरू शकते.[१५] स्ट्रेरॉईड्जमुळे वेदना कमी होत असल्या[][१६] तरी नेहेमीच ते देऊ नये.[] मोठ्या माणसांना ॲस्पिरिन देऊ शकता, पण लहान मुलांना ती देऊ नये, कारण त्यातून रेयेज सिन्ड्रोम[] हा आजार उद्भवण्याची शक्यता असते.

प्रतिजैविके

प्रभावीपणा आणि स्वस्त असल्यामुळेयुनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये फेनोक्सि मेथयिलपेनिसिलीन हे प्रतिजैविक स्ट्रेप्टोकोकल फॅरिन्जायटिस झाल्यावर वापरण्यात येते.[] युरोपमध्ये ॲमोक्सिसिलिन वापरले जाते.[१७]भारतामध्ये संधीवाताचा ताप येण्याची शक्यता जास्त असल्यामुळे, बेन्झथाईन पेनिसिलिन G ही लस प्राधान्याने दिली जाते.[] योग्य प्रतिजैविके दिली, की ३-५ दिवस दिसत असणारी आजाराची लक्षणं किमान एक दिवसाने कमी होतात आणि आजाराचा प्रसारही आटोक्यात येतो.[१०] पुढच्या गुंतागुंतीचे आजार जसे की संधीवाताचा ताप आणि पेरिटॉन्सिलर ॲबसेस टाळणे हेही प्रतिजैविके देण्याचे प्राथमिक कारण आहे.[१८] प्रतिजैविके देताना त्यांचे होणारे दुष्परिणाम देखील विचारात घेतले पाहिजेत,[] आणि ज्या व्यक्तीं अशा औषधांना प्रतिकूल प्रतिसाद देतात त्यांना असे उपचार देऊ नयेत.[१८] स्ट्रेप थ्रोटचा प्रसार जितका असतो, त्यापेक्षा जास्त प्रमाणात प्रतिजैविके दिली जातात.[१९] ज्यांना पेनिसिलिन दिल्याने त्रास होतो penicillin allergies, त्यांना एरिथ्रोमायसिन, मॅक्रोलाईड्ज किंवा क्लिन्डामायसिन दिले जाते.[][] ज्यांना तुलनेने कमी त्रास होतो, त्यांची उपचारांची सुरुवात ही सेफॅलोस्पोरिन्स देऊन केली जाते.[] स्ट्रेप्टोकोकल संसर्गामुळे तीव्र ग्लोमेरुलोनेफ्रायटीस ही होऊ शकतो, आणि हा दुष्परिणाम प्रतिजैविके देऊन टाळता येऊ शकेलच असे नाही.[]

पूर्वनिदान

स्ट्रेप थ्रोटची लक्षणं कोणत्याही औषधांशिवायही ३ ते ५ दिवसात बरी व्हायला लागतात.[१०] प्रतिजैविके दिल्याने पुढची गुंतागुंत आणि आजाराचा प्रसार आटोक्यात येतो; प्रतिजैविके दिल्यानंतर लहान मुले पुढच्या २४ तासात शाळेत जाऊ शकतात.[] मोठया माणसांमध्ये आजाराची गुंतागुंत होण्याचे प्रमाण कमी असते.[] अपवादात्मक परिस्थितीत लहान मुलांना संधीवाताचा ताप होऊ शकतो. मात्र भारत, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागात तो हृदयरोगाचे कारण होऊ शकतो.[]

स्ट्रेप्टोकोकल संसर्गामुळे होणारे गुंतागुंतीचे आजार:

  • संधीवाताचा ताप Acute rheumatic fever[]
  • जांभळा ताप Scarlet fever[२०]
  • टॉक्सिक शॉक सिन्ड्रोम Streptococcal toxic shock syndrome[२०][२१]
  • ग्लोमेरुलोवनफ्रायटिस Glomerulonephritis[२२]
  • PANDAS PANDAS syndrome[२२]
  • पेरिटॉन्सिलर ॲबसेसPeritonsillar abscess[]
  • सर्व्हायल लिफाडेनिटिस Cervical lymphadenitis[]
  • मास्टोइडायटिस Mastoiditis[]

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये या आजारामुळे बालकांवर होणारा खर्च हा सुमारे ३५० मिलियन डॉलर आहे.[]

रोगपरिस्थितिविज्ञान

’घशाचे विकार’ Pharyngitis, या ज्या मोठ्या वर्गाखाली स्ट्रेप्टोकोकल फॅरिन्जायटिसचे वर्गीकरण होते त्या मुळे युनायटेड स्टेट्समध्ये सुमारे ११ मिलियन लोक आजारी पडतात.[] रोगजंतूंमुळे अनेक जण आजारी पडतात; मात्र ग्रुप ए बीटा हेमोलायटिक स्ट्रेप्टोकोकसमुळे १५ ते ३०% मुलांना आणि ५ ते २०% मोठ्या माणसांना घशाचे आजार होतात.[] सहसा थंडीचा मौसम सरताना आणि वसंत ऋतू सुरू होताना हा आजार अधिक आढळतो.[]

संदर्भ

  1. ^ साचा:DorlandsDict
  2. ^ a b Shaikh N, Leonard E, Martin JM (2010). "Prevalence of streptococcal pharyngitis and streptococcal carriage in children: a meta-analysis". Pediatrics. 126 (3): e557–64. doi:10.1542/peds.2009-2648. PMID 20696723. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)
  3. ^ a b c d e f g h i j k l m n o p Shulman, ST (2012 Sep 9). "Clinical Practice Guideline for the Diagnosis and Management of Group A Streptococcal Pharyngitis: 2012 Update by the Infectious Diseases Society of America". Clinical infectious diseases : an official publication of the Infectious Diseases Society of America. PMID 22965026. Unknown parameter |coauthors= ignored (|author= suggested) (सहाय्य); |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v Choby BA (२००९). ए ए एफपी.ऑर्ग "Diagnosis and treatment of streptococcal pharyngitis" Check |दुवा= value (सहाय्य). Am Fam Physician. 79 (5): 383–90. PMID 19275067. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
  5. ^ a b Brook I, Dohar JE (२००६). "Management of group A beta-hemolytic streptococcal pharyngotonsillitis in children". J Fam Pract. 55 (12): S1–11, quiz S12. PMID 17137534. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
  6. ^ a b c d e Hayes CS, Williamson H (2001). "Management of Group A beta-hemolytic streptococcal pharyngitis". Am Fam Physician. 63 (8): 1557–64. PMID 11327431. 2008-05-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-09 रोजी पाहिले. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
  7. ^ a b c d e f Baltimore RS (2010). "Re-evaluation of antibiotic treatment of streptococcal pharyngitis". Curr. Opin. Pediatr. 22 (1): 77–82. doi:10.1097/MOP.0b013e32833502e7. PMID 19996970. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
  8. ^ Lindbaek M, Høiby EA, Lermark G, Steinsholt IM, Hjortdahl P (2004). "Predictors for spread of clinical group A streptococcal tonsillitis within the household". Scand J Prim Health Care. 22 (4): 239–43. doi:10.1080/02813430410006729. PMID 15765640.CS1 maint: multiple names: authors list (link)
  9. ^ Smith, Ellen Reid; Kahan, Scott; Miller, Redonda G. (2008). In A Page Signs & Symptoms. In a Page Series. Hagerstown, Maryland: Lippincott Williams & Wilkins. p. 312. ISBN 0-7817-7043-2.
  10. ^ a b c d Bisno AL, Gerber MA, Gwaltney JM, Kaplan EL, Schwartz RH (2002). "Practice guidelines for the diagnosis and management of group A streptococcal pharyngitis. Infectious Diseases Society of America". Clin. Infect. Dis. 35 (2): 113–25. doi:10.1086/340949. PMID 12087516. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)
  11. ^ Johnson BC, Alvi A (2003). "Cost-effective workup for tonsillitis. Testing, treatment, and potential complications". Postgrad Med. 113 (3): 115–8, 121. PMID 12647478. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
  12. ^ van Staaij, BK (2005 Jan). "Adenotonsillectomy for upper respiratory infections: evidence based?". Archives of disease in childhood. 90 (1): 19–25. PMID 15613505. Unknown parameter |coauthors= ignored (|author= suggested) (सहाय्य); |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  13. ^ Burton, MJ (2009 Jan 21). "Tonsillectomy or adeno-tonsillectomy versus non-surgical treatment for chronic/recurrent acute tonsillitis". Cochrane database of systematic reviews (Online) (1): CD001802. PMID 19160201. Unknown parameter |coauthors= ignored (|author= suggested) (सहाय्य); |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  14. ^ Thomas M, Del Mar C, Glasziou P (2000). "How effective are treatments other than antibiotics for acute sore throat?". Br J Gen Pract. 50 (459): 817–20. PMC 1313826. PMID 11127175. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)
  15. ^ "Generic Name: Lidocaine Viscous (Xylocaine Viscous) side effects, medical uses, and drug interactions". MedicineNet.com. 2010-05-07 रोजी पाहिले.
  16. ^ "Effectiveness of Corticosteroid Treatment in Acute Pharyngitis: A Systematic Review of the Literature". Andrew Wing. 2010; Academic Emergency Medicine. 2012-12-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  17. ^ Bonsignori F, Chiappini E, De Martino M (2010). "The infections of the upper respiratory tract in children". Int J Immunopathol Pharmacol. 23 (1 Suppl): 16–9. PMID 20152073.CS1 maint: multiple names: authors list (link)
  18. ^ a b Snow V, Mottur-Pilson C, Cooper RJ, Hoffman JR (2001). "Principles of appropriate antibiotic use for acute pharyngitis in adults" (PDF). Ann Intern Med. 134 (6): 506–8. PMID 11255529. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)
  19. ^ Linder JA, Bates DW, Lee GM, Finkelstein JA (2005). "Antibiotic treatment of children with sore throat". J Am Med Assoc. 294 (18): 2315–22. doi:10.1001/jama.294.18.2315. PMID 16278359. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)
  20. ^ a b "UpToDate Inc". 2008-12-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  21. ^ Stevens DL, Tanner MH, Winship J; et al. (1989). "Severe group A streptococcal infections associated with a toxic shock-like syndrome and scarlet fever toxin A". N. Engl. J. Med. 321 (1): 1–7. doi:10.1056/NEJM198907063210101. PMID 2659990. Unknown parameter |month= ignored (सहाय्य); Explicit use of et al. in: |author= (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)
  22. ^ a b Hahn RG, Knox LM, Forman TA (2005). "Evaluation of poststreptococcal illness". Am Fam Physician. 71 (10): 1949–54. PMID 15926411. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)