स्टेडियम
स्टेडियम ही मैदानी खेळ, सोहळे व इत्यादी घटनांसाठी वापरली जाणारी इमारत आहे. स्टेडियम हा शब्द ग्रीक शब्द स्टेडियोन (στάδιον) ह्यावरून वापरात आला आहे. प्राचीन ग्रीसमधील ऑलिंपिया शहरात सुमारे इ.स. पूर्व ७७६ साली जगातील पहिले स्टेडियम बांधले गेले होते.
सध्या क्रिकेट, फुटबॉल इत्यादी अनेक लोकप्रिय खेळांसाठी अनेक स्टेडियम बांधली गेली आहेत.
हे सुद्धा पहा
- ऑलिंपिक मैदाने