Jump to content

स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस

स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस (सामाजिक न्यायाचा पुतळा), याला डॉ. बी.आर. आंबेडकर स्मृतिवनम (मराठी: डॉ. बी.आर. आंबेडकर स्मारक) म्हणूनही ओळखले जाते, हे आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथे स्थित एक पुतळा-स्मारक आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेला हा पुतळा १२५ फूट (३८ मी) उंच असून ८१ फूट (२५ मीटर) उंच पायाभूत इमारतीवर उभा आहे, अशाप्रकारे त्याची एकूण उंची २०६ फूट (६३ मीटर) आहे. हा भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात उंच पुतळा आहे. मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी १९ जानेवारी २०२४ रोजी या पुतळ्याचे अनावरण केले. हे स्मारक २० एकर (८.१ हेक्टर) मध्ये असून त्याला खर्च ₹४०० कोटी आला आहे.

९ जुलै, २०२० रोजी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी विजयवाड्याच्या मध्यभागी असलेल्या स्वराज मैदानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ फूट उंच पुतळ्याची पायाभरणी केली होती. आणि १९ जानेवारी २०२४ रोजी त्याचे लोकार्पण केले जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समता आणि सामाजिक न्यायाचे थोर पुरस्कर्ते होते. त्यामुळे, त्यांच्या पुतळ्याला आंध्र प्रदेश सरकारने "सामाजिक न्यायाचा पुतळा" असे नाव दिले.

हे सुद्धा पहा

संदर्भ