Jump to content

स्टॅचू ऑफ युनिटी

स्टॅचू ऑफ युनिटी
स्थान साधू बेट,राजपीपळा,गुजरात
रचनाकारराम सुतार (शिल्पकार)राम सुतार (शिल्पकार)
प्रकारपुतळा
उंची १८२ मीटर
सुरुवातीचा दिनांक ३१ ऑक्टोबर २०१४
खुलण्याची तारीख १ नोव्हेंबर २०१८
संकेतस्थळ www. Statue of unity.com
स्टॅच्यू ऑफ युनिटी

स्टॅच्यू ऑफ युनिटी (मराठी: एकतेचा पुतळा) हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. हा पुतळा भारताततील गुजरात राज्याच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर उभारलेला आहे. स्मारक २०,००० मी क्षेत्रात आहे आणि १२ किमी आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेले आहे. १८२ मीटर (५९७ फूट) उंचीचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.[]

ऑक्टोबर २०१४ मध्ये, या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी २९८९ कोटी रुपयांचा करार लार्सन ॲन्ड ट्यूब्रो यांच्याशी केला होता. पुतळ्याचे बांधकाम ३१ ऑक्टोबर २०१४पासून सुरू झाले आणि मध्य-ऑक्टोबर २०१८मध्ये पूर्ण झाले.

भारतीय मूर्तिकार राम व्ही. सुतार यांनी ही संरचना (डिझाइन) केली होती.[] आणि पटेलांच्या जयंतीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले.[]

संदर्भ

  1. ^ Sharma, Ashwani (2014-12-29). "14 Things You Did Not Know About Sardar Patel, The Man Who United India". TopYaps (इंग्रजी भाषेत). 2018-09-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-10-31 रोजी पाहिले.
  2. ^ स्टॅच्यू ऑफ युनिटी : मराठी माणसानं घडवला सरदार पटेलांचा पुतळा. BBC News मराठी. 19-11-2018 रोजी पाहिले. गुजरातमध्ये साकारण्यात आलेल्या सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे. हा जगातला आतापर्यंतचा (इ.स. २०१९ साल) सर्वांत उंच पुतळा आहे. या पुतळ्याचे शिल्पकार महाराष्ट्रातले राम सुतार हे आहेत. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "Ekta Yatra". Statue of Unity (इंग्रजी भाषेत). 2019-03-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-10-31 रोजी पाहिले.