स्टान क्रीक जिल्हा
हा लेख बेलीझचा स्टान क्रीक जिल्हा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, स्टान क्रीक (निःसंदिग्धीकरण).
स्टान क्रीक जिल्हा बेलीझ देशातील सहापैकी एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्र डांग्रिगा येथे आहे.
देशाच्या दक्षिणेस कॅरिबियन समुद्रावर असलेल्या जिल्ह्यात केळीच्या मोठ्या बागा आहेत. पूर्वी येथे मोठ्या प्रमाणात लाकूडतोडी होत असे.
२०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३२,१६६ होती. बेलीझच्या प्रतिनिधीगृहातील ३१ पैकी दोन मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत.