स्टटेरा, दरायस तिसरा याची पत्नी
ही दरायस तिसरा याची पत्नी होती. आयससच्या लढाईत दरायस पळून गेल्यावर स्टटेरा, दरायसची आई, मुलगी (ही देखील स्टटेरा) आणि इतर जनानखाना यांना अलेक्झांडर द ग्रेटने बंदिवान केले. पुढे बंदिवासातच स्टटेराचा मृत्यू झाला.
इतिहासात हिचे आणि दरायसची मुलगी स्टटेरा यांचे नाव सारखे असल्याने बरेचदा गफलत होते. दरायसच्या मुलीशी पुढे अलेक्झांडरने लग्न केले. पुढे अलेक्झांडरची दुसरी पत्नी रोक्झाना (रॉक्सेन) हिने इ.स.पू. ३२८मध्ये तिची हत्या केली.