Jump to content

स्कॉटलंड क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२१

स्कॉटलंड क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२१
नेदरलँड्स
स्कॉटलंड
तारीख१९ – २० मे २०२१
संघनायकपीटर सीलारकाईल कोएट्झर
एकदिवसीय मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावामॅक्स ओ'दाउद (९०) जॉर्ज मुन्से (१०६)
सर्वाधिक बळीव्हिव्हियन किंग्मा (५) ॲलेसडेर इव्हान्स (६)

स्कॉटलंड क्रिकेट संघाने दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी मे २०२१ दरम्यान नेदरलँड्सचा दौरा केला. नेदरलँड्सने या मालिकेपुर्वी जून २०१९ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला होता. तर डिसेंबर २०१९ मध्ये स्कॉटलंडने शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला होता. अनुभवी पीटर सीलार याच्याकडेच नेदरलँड्सचे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले तसेच काईल कोएट्झरचीही स्कॉटलंडच्या कर्णधारपदी निवड तशीच ठेवण्यात आली.

दोन्ही सामने रॉटरडॅम येथी हझेलारवेग स्टेडियम वर खेळविण्यात आले. पहिला सामना नेदरलँड्सने जिंकला तर दुसरा सामना स्कॉटलंडने जिंकत दोन सामन्यांची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

१९ मे २०२१
११:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१६४/८ (३३ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१४९/८ (३३ षटके)
मॅक्स ओ'दाउद ८३ (१०२)
गेव्हीन मेन २/१६ (७ षटके)
नेदरलँड्स १४ धावांनी विजयी.
हझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि नितीन बाठी (ने)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३३ षटकांचा करण्यात आला.
  • आर्यन दत्त आणि लोगन व्हान बीक (ने) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


२रा एकदिवसीय सामना

२० मे २०२१
११:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१७१ (४८.४ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१७२/४ (४२.१ षटके)
स्कॉटलंड ६ गडी राखून विजयी.
हझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम
पंच: नितीन बाठी (ने) आणि अड्रीयन व्हान देन द्रीस (ने)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
  • फिलिप बोईसेवेन (ने) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.