Jump to content

स्कायटीम

स्कायटीमचा लोगो
स्कायटीमच्या विशेष लाइव्हरीमध्ये रंगवलेले अलिटालियाचे रोम विमानतळावर उतरणारे बोइंग ७६७ विमान

स्कायटीम (SkyTeam) हा जगातील अनेक विमान वाहतूक कंपन्यांचा एक समूह आहे. इ.स. २००० साली स्थापन करण्यात आलेल्या व अ‍ॅम्स्टरडॅमच्या श्चिफोल विमानतळावर मुख्यालय असलेल्या स्कायटीममध्ये सध्या २० सदस्य आहेत. स्टार अलायन्सवनवर्ल्ड नंतर स्कायटीम ही विमान कंपन्यांनी बनवलेली तिसरी संघटना होती.

स्कायटीम सदस्य कंपन्यांकडून एकत्रितपणे सध्या एकूण १७८ देशांमधील १,०६४ विमानतळांवर प्रवासी वाहतूकसेवा पुरवली जाते.

विद्यमान सदस्य

एरोमेक्सिको, एर फ्रान्स, डेल्टा, व कोरियन एर हे चार स्कायटीमचे संस्थापक आहेत.
सदस्य विमानकंपनी कधी सामील
रशिया एरोफ्लोत14 April 2006
आर्जेन्टिना एरोलिनिआस आर्जेन्तिनास29 August 2012
मेक्सिको एरोमेक्सिको22 June 2000
स्पेन एर युरोपा4 September 2007
फ्रान्स एर फ्रान्स22 June 2000
इटली अलिटालिया13 January 2009
तैवान चायना एरलाइन्स28 September 2011
चीन चायना ईस्टर्न एरलाइन्स21 June 2011
चीन चायना सदर्न एरलाइन्स15 November 2007
चेक प्रजासत्ताक चेक एरलाइन्स25 March 2001
अमेरिका डेल्टा एरलाइन्स 22 June 2000
इंडोनेशिया गरुडा इंडोनेशिया5 March 2014
केन्या केन्या एरवेझ4 September 2007
नेदरलँड्स के.एल.एम. 13 September 2004
दक्षिण कोरिया कोरियन एर22 June 2000
लेबेनॉन मिडल ईस्ट एरलाइन्स28 June 2012
सौदी अरेबिया सौदिया29 May 2012
रोमेनिया तारोम 25 June 2010
व्हियेतनाम व्हियेतनाम एरलाइन्स10 June 2010
चीन च्यामेन एरलाइन्स 21 November 2012

बाह्य दुवे