स्काय स्पोर्ट्स
स्काय स्पोर्ट्स | |
---|---|
सुरुवात | एप्रिल २०, इ.स. १९९१ |
मालक | स्काय पी.एल.सी. |
संकेतस्थळ | http://www.skysports.com/ |
स्काय स्पोर्ट्स हा युनायटेड किंग्डम व आयर्लंड देशांमधील क्रीडा कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या वाहिन्यांचा एक समूह आहे. २० एप्रिल १९९१ रोजी स्थापन झालेल्या स्काय स्पोर्ट्सवर प्रीमियर लीग व इतर फुटबॉल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, यू.एस. ओपन टेनिस स्पर्धा, फॉर्म्युला वन इत्यादी प्रमुख खेळ स्पर्धांचे प्रसारण केले जाते. तसेच अमेरिकेमधील नॅशनल फुटबॉल लीग (सुपरबोलसहित) ब्रिटनमध्ये प्रसारित करण्याचे हक्क देखील स्काय स्पोर्ट्सकडेच आहेत.