Jump to content

सौदी अरेबियातील महिलांचे हक्क

२०व्या शतकाच्या शेवटी आणि २१व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, सौदी अरेबियातील महिलांचे हक्क त्याच्या अनेक शेजारी देशांतील स्त्रियांच्या अधिकारांच्या तुलनेत मर्यादित होते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या २०१६ ग्लोबल जेन्डर गॅप रिपोर्टमध्ये लिंग गुण समानतेच्या बाबतीत सौदी अरेबियाचा क्रमांक १४४ पैकी १४१वा होता. २०१५ मध्ये तोच क्रमांक १३४ वा होता.


संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने (ईसीओएसओसी) २०१८-२०२२ साठी महिलांच्या स्थितीवर यू.एन. आयोगामध्ये सौदी अरेबियाची निवड केली. २०१५ च्या आकडेवारीनुसार सौदी अरेबियात १३% स्त्री कर्मचारी आहेत. एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात महिलांनी आपल्या अधिकारांबद्दल आंदोलन केल्यामुळे त्यांच्या स्थितीत काही सुधारणा घडली. पूर्वी महिलांना निवडणुकांमध्ये मतदान करण्यापासून किंवा कोणत्याही राजकीय कार्यालयात मतदान करण्यासाठी मनाई केली होती. परंतु २०११ मध्ये राजा अब्दुल्ला यांनी स्थानिक निवडणुका, तसेच सल्लागार मंडळाध्ये नियुक्त करण्यासाठी महिलांना हक्क दिला.