सोलापूर जिल्हा मुष्टियुद्ध संघटना
सोलापूर जिल्हा मुष्टियुद्ध संघटना महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील मुष्टियुद्धाच्या खेळाचे संघटन करणारी संस्था आहे. ही १९९२ साली पंढरपूर येथे सुधाकरपंत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. ही संघटना महाराष्ट्र मुष्टियुद्ध संघटनेशी संलग्न असून या संघटनेने मुष्टियुद्ध या पारंपरिक खेळाचा प्रचार खेडोपाडी केला आहे.[१] प्रशांतराव परिचारक हे संघटनेचे अध्यक्ष असून, कैवल्य उत्पात हे सचिव आणि प्रशिक्षक आहेत.
जिल्हा मुष्टियुद्ध संघटनेचा मुख्य क्लब हा पंढरपूर येथील सावरकर वाचनालय येथे कार्यरत आहे. या संघटनेच्या अनेक विद्यार्थ्यांनी आजवर राज्य व राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये बिहार, पंजाब, महाराष्ट्र या राज्यांत झालेल्या राष्ट्रीय विविध स्पर्धांचा समावेश आहे. डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत संघटनेचा विद्यार्थी शुभम कुसुरकर याने विजेतेपद मिळवले व पुढील होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत प्रवेश केला.
आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अनेक संघटना स्थापन झाल्या आहेत.
स्थापना
१९९२