सोलर मोबाईल चार्जर
सौरऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळवलेली ऊर्जा. सूर्य हा पृथ्वीवरील प्रमुख नैसर्गिक ऊर्जास्रोत आहे. ऊर्जेची गरज सध्याच्या तुलनेत काही पटीत वाढेल आणि सध्या वीजनिर्माण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आण्विक ऊर्जा क्षेत्राने दिवसाला एक अशा गतीने अणुभट्ट्या उभारल्या तरी ही गरज पुरी होण्यासारखी नाही. शिवाय जपानमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जगानेही अणुप्रकल्पांचा फेरविचार करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर तासात पृथ्वीवर पडणारी सौरऊर्जा ही रूपांतरित केल्यास आपली एका वर्षाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पुरेशी असते.
सौरऊर्जेचा महत्त्व
सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. सौर ऊर्जा घेण्यासाठी घरात कुठल्याही प्रकारचा मीटर बसवावा लागत नाही व कुठलेही बिल भरावे लागत नाही. मोठ्या प्रमाणात सूर्याची ऊर्जा उपलब्ध असून त्याचा आपण जर उपयोग करू शकलो तर निसर्गातील झाडांची तोड थांबू शकेल. त्यामुळे पर्यावरण ऱ्हासालाही आळा बसेल. दिवसातील १२ तास सौर ऊर्जा आपल्या बरोबरच असते. उरलेल्या १२ तासांसाठी आपण सौर ऊर्जेची साठवण करून रात्रीच्या वेळी उपयोगात आणू शकतो यासाठी खर्च सुद्धा अल्पप्रमाणात येतो.
ऊर्जेचा नियम
उर्जा निर्माण करता येत नाही, तसेच उर्जा नष्ट ही करता येत नाही; मात्र उर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते हा उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम आहे. विश्वातील सर्व उर्जा कायम स्थिर आहे. ती केव्हाही नष्ट होणार नाही. मात्र ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरित होऊ शकते.
सौरऊर्जेचा वापर करून मोबाईल चार्जर बनवणे
लागणारे साहित्य
- सोलर पॅनेल
- व्होल्टेज रेग्यु लेटर
- डायोड
- यु एस बी कनेक्टर
- पीसी बी बोर्ड
- सोल्डेरिंग वायर
- केसिंग
- नट बोल्ट
साधने
- सोल्डरींग गन आणि मेटल
- ड्रिल मशीन
- डी सोल्डरिंग पंप
- स्ट्रीपर
- स्क्रू ड्रॉयव्हर
सर्किट आकृती
कनेक्शन
- USB पोर्टचा +ve व्होल्टेज रेग्युलेटरच्या इनपुटला जोडणे.
- USB पोर्टचा -ve व्होल्टेज रेग्युलेटरच्या GNDला जोडणे.
- सोलर पॅनलचा -ve व्होल्टेज रेग्युलेटरच्या GNDला जोडणे.
- सोलर पॅनलचा +Ve डायोडच्या +Veला जोडणे.
- डायोडचा -Ve व्होल्टेज रेग्युलेटरच्या आउटपुटला जोडणे.
पायऱ्या
- पायरी 1 :- सुरुवातीला पीसीबी बोर्ड घेणे. आणि त्यावर सर्किट आकृती मध्ये दिलेल्या प्रमाणे साहित्य (Electronic Component )लावून सोल्डर करणे
- पायरी 2 :- ड्रिल मशीन वापरून पीसीबी बोर्ड, इलेक्टिकल फिटिंग पट्टी पासून बनवलेल्या कव्हर आणि पांढरा कलर मधील ऍक्रलिक प्लेट यावर ३mmचे होल करून घेणे.ड्रिल मशीन वापरून पीसीबी बोर्ड, इलेक्टिकल फिटिंग पट्टी पासून बनवलेल्या कव्हर आणि पांढरा कलर मधील ऍक्रलिक प्लेट यावर ३mmचे होल करून घेणे.
- पायरी 3 :- इलेक्टिकल फिटिंग पट्टी पासून बनवलेल्या कव्हरची वरील प्लेट लावून घेणे.
- पायरी 4 :- सोलर पॅनल हे ऍक्रलिक प्लेट वर चौकोनी आकाराची छोटी प्लेट लावून ती फिक्स टाकणे.
चाचणी
- सोल्डरिंग झाल्यावर त्याचे कनेक्शन झाले कि नाही ते मल्टीमीटरच्या साह्याने तपासा .
- सौर पॅनेल पासून पुरवठा प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत आहे की नाही हे तपासा.
खर्च
- सोलर पॅनेल - 220 रुपये
- व्होल्टेज रेग्यु लेटर - 15 रुपये
- डायोड - 1 रुपये
- यु एस बी कनेक्टर - 15 रुपये
- पीसी बी बोर्ड - 5 रुपये
- सोल्डेरिंग वायर - 5 रुपये
- केसिंग - 20 रुपये
- नट बोल्ट - 1 रुपये
- एकूण : 282 रुपये
STEM
- स्टेम (STEM): - Science, Technology, Engineering, Mathematics
आपण यात स्टेम काय शिकलो
- विज्ञान - सोलर पॅनल काम कसे करते, ऊर्जा अक्षतेचा नियम,
- तंत्रज्ञान - सोलर पॅनल बनवणे, इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनन्ट्सची ओळख
- अभियांत्रिकी – Prototyping, सोल्डरिंग जोडणी
- गणित - मोजमाप, युनिट, खर्च काढणे.
संदर्भ
- ^ "Learning While Doing". learningwhiledoing.in. 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ "Vigyan Ashram". vigyanashram.com. 2019-12-08 रोजी पाहिले.