सोफिया (यंत्रमानव)
हा लेख स्त्री सदृश यंत्रमानव सोफिया याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सोफिया (निःसंदिग्धीकरण).
सोफिया ही मानव (स्त्री) सदृश यंत्रमानव आहे. सिंगापूरच्या हॅन्सन रोबोटिक्सने बनविलेल्या या सांगकाम्यास १५ एप्रिल, २०१५ रोजी कार्यान्वित केले गेले. सौदी अरेबियाने सोफियाला नागरिकत्व दिले आहे. एका देशाचे पूर्ण नागरिकत्व मिळविणारी ‘सोफिया’ ही जगातील पहिली आणि सध्या एकमेव मानवीय रोबो आहे. हाँगकाँगस्थित हॅनसन रोबॉटिक्सने सोफियाची निर्मिती केली आहे. माणसांप्रमाणेच सोफिया आपल्या भावना व्यक्त करू शकते. सोफियाचे निर्माते डेव्हिड हॅनसन यांच्यामते सोफियाची निर्मिती ही वयोवृद्धांची मदतनीस ही संकल्पना मुळाशी धरून केली आहे. सोफियाच्या शरीराची ठेवण प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री ऑड्री हेपबर्नशी मिळतीजुळती ठेवली आहे.