Jump to content

सोन चिखल्या

विणीच्या काळातील सोन चिखल्याचा पिसारा
सोन चिखल्या
Pluvialis fulva

सोन चिखल्या किंवा सोनटिटवी किंवा छोटा टिटवई (इंग्लिश:Pacific Golden Plover; हिंदी:छोटा बटन; संस्कृत:प्राच्य स्वर्ण टिट्टिभ; गुजराती:सोनेरी बटण टिटोडी; तमिळ:कोट्टान) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने तित्तिराएवढा असून याचे डोके जाड, पाय काटकुळे, चोच कबुतरासारखी असते. रंग वरून उदी, त्यावर पांढऱ्या व सोनेरी टिकल्या, खालून पांढरा, छातीवर बदामी, करडा व त्यावर पिवळ्या रंगाचे ठिपके असतात. उडताना पंखाची टोके टोकदार दिसतात व त्यांवर पट्टे नसतात. उदी शेपटी पंख्याप्रमाणे पसरलेली असते. उन्हाळ्यात-म्हणजे विणीच्या हंगामात खालून काळी असते. थंडीच्या दिवसात पाहुणे म्हणून आल्यावर, तसेच, वसंतात परत जाताना ते खालून रंगीबेरंगी आणि काळे-पांढरे दिसतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात. ते थव्याने आढळतात.

वितरण

हे पक्षी भारतीय उपखंड, नेपाळ, श्रीलंका, मालदीव, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांत हिवाळी पाहुणे असतात. पूर्व आशिया आणि उत्तर अमेरिका येथे त्यांची वीण होते.

निवासस्थाने

ते दलदली प्रदेश, धान्याची शेते, चिखलाणी आणि गवती कुरणे याठिकाणी आढळतात.

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली.