Jump to content

सोंस

सोंस (Platanista gangetica) किंवा गंगेतील डॉल्फिन हा एक सदंत देवमासा असून तो गंगा आणि गंगेला मिळणाऱ्या भारत, नेपाळ व बंगलादेशातील नद्यात सापडतो. पाकिस्तानातील सिंधू नदीतील आकाराने लहान असलेला सिंधू नदी डॉल्फिन ही त्याच्या जवळची जाती आहे. या डॉल्फिनला हिंदीत सोंस बंगालीत शुशुक व आसामीत सिसू म्हणतात. भारत शासनाने त्याला राष्ट्रीय जलचर असा दर्जा दिलेला आहे.

निद्रा

सोंस अथवा गंगावासी डॉल्फिन सारा जन्म पाण्यात काढतो, पण त्याला दर तीन मिनिटांनी पाण्याबाहेर डोके काढून श्वासोच्छ्वास करणे आवश्यक असते. उथळ पाण्यात डोके बाहेर ठेवून लोळत झोप काढणे फार धोक्याचे आहे, तेव्हा सोंसला पाण्यात २४ तास पोहत राहून मधूनच डोके काढत श्वास घेणे भाग आहे. हे आव्हान स्वीकारत सोंस झोपेतही पोहायचे थांबवत नाही. त्याला हे जमते कारण सोंसच्या मेंदूची झोप आणि शरीराची झोप वेगवेगळी असते, आणि शरीराने पोहताना त्याचा मेंदू छोट्या छोट्या चुटक्यांत झोपत दिवसाकाठी आठ तास विश्रांती घेतो.