Jump to content

सॉक्रेटिस

सॉक्रेटिस आणि त्याची प्रश्नांतून शिक्षणपद्धत

सॉक्रेटीस ( इ. स. पू. सुमारे ४७०–३९९

सॉक्रेटिस हा एक थोर शिक्षक गणला जातो. त्याची शिक्षणपद्धत ही वेगळीच होती व तो प्रश्न विचारत-विचारत शिकवे व लोकांकडून उत्तरे मिळवे. "ex duco"चा अर्थ "lead out" होतो जो "education" ह्या शब्दाचा गाभा आहे. उत्तरे "मिळवणे" हे "lead out" किंवा त्यातूनच मार्ग दाखवणे अशा अर्थाने पाहिले तर अशा शिक्षणपद्धतीचे महत्त्व पटते.

शिष्योत्तम

आज त्याच्या प्रश्नावलीबाबत आपल्याला जी माहिती आहे ती त्याच्या शिष्योत्तमामुळे. प्लॅटो व ऍरिस्टॉटल हे त्याचे शिष्य होते. व त्यांनी सॉक्रेटिसची ही प्रश्नावली लिहून ठेवल्यामुळेच ती आज जगाला माहीत आहे असे समजले जाते. त्याची विचार करण्याची पद्धत संवादाची होती. प्राचीन ग्रीक नगर राज्यातील एक महानतम विचारवंत माणसाकडे अर्थाने सप्रेटीसने आपल्या काळामध्ये तत्कालीनच सोफिष्ठांचा तत्त्वज्ञान होतं ते विकसित करण्याचा प्रयत्न केला त्यांचा तो विचारांमध्ये बदल करण्याचा जो हेतू होता तो विधायक होता कारण त्या विचारांमध्ये आधुनिकतेला कुठली आहे प्रकारचा थारा नव्हता त्यांची समाज आपल्या मूळ जुन्या विचारांना जुन्या प्रथा परंपरा टिकून बसलेला होता अशा परिस्थिती मध्ये एक राष्ट्रपुत्र म्हणून आपल्या राष्ट्रांमध्ये जे एक कर्मकांडांचं औडंबर माजलेला होतं अशा अशा परिस्थितीमध्ये सॉक्रेटिस ने त्या विचारांमध्ये लोकांना बदल करण्यासाठी प्रेरित केले तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये सॉकेटिंगच्या विचारांशी जुळवून घेत होता तरुण विद्यार्थी सॉक्रेटीसच्या त्या विषयांना अनुरूप होते पण तत्कालीन परिस्थितीमध्ये जे सोफास्टचे तत्त्वज्ञान स्वीकारणारे मंडळी होती ती मात्र सॉकेटिसला दोषी ठरवत होती आणि सहाजिकच त्या दोषामुळे सॉक्रेटिसवर राष्ट्रद्रोहाचा राजद्रोहाचा आरोप करण्यात आला आणि त्या आरोपामध्ये असे सिद्ध केले गेले की सॉक्रेटिस हा तरुण पिढीला बिघडवीत आहे जुन्या प्रथा परंपरा आणि ज्याला आपण दैवी शक्ती मानतो हे आपल्या राष्ट्रातलं आहे त्यामध्ये तो बदल करणे म्हणजे तो पाप करत आहे अशा प्रकारची भावना लोकांची झाले आणि त्या लोकांनी त्या बसलेल्या त्या लोकांच्या दरबारांनी सॉक्रेटिसला देह दंडाची शिक्षा देण्याचे ठरवलं एक महान तत्वज्ञ विचारवंत होता त्यांनी म्हणले की माझ्या एकाच्या मृतूने जर तुमचे काही भले होत असेल तर ते मी स्वीकारायला तयार आहे आणि त्या लोकांनी तत्कालीन धर्म मार्तंड आणि सक्रिटिशन विषयाचा त्याला देणार आणि सॉक्रेटिस ने तो आनंदाने प्राशन केलं सॉक्रेटिसच्या मृत्यूने देहाने सॉक्रेटिस गेला पण आपल्या विचाराने आपल्या तत्त्वज्ञानाने आपल्या एकंदरीत त्या राष्ट्रातील हितासाठी निर्माण केलेल्या संस्कृतीने मात्र एकंदरीत लोकांमध्ये खूप प्रसिद्ध असा विचारवंत म्हणून हे सगळं प्रसिद्ध अशी ख्याती मिळून त्यांचा शिष्य प्लेटो त्यांच्या वर त्यांच्या मृत्यूचा गंभीर परिणाम पडलेला आहे आणि प्लेटोने त्यांच्या मृत्यूची किंवा त्यांना दिलेल्या शिक्षेची दोष हा लोकांना देत नव्हते तर त्या लोकांतील विचारांना त्यांच्या बौद्धिक दिला देत होते कारण माझ्या राष्ट्रातील लोक सर्व हुशार आणि विद्वावानअसते तर एका महान विचारवंतावर अशी मृत्यूची पाळी आली नसती म्हणून प्लेटोने त्या लोकांमध्ये जनजागरण करण्यासाठी तत्कालीन ग्रीक नगर राज्यामध्ये आपली अकॅडमी स्थापन करून लोकांना एक चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी अख्ख आयुष्य खर्च केलं आणि एक महान विचारवंत म्हणून प्लेटोनाही ख्याती मिळालेली आहे सॉक्रेटिस प्लेटो अरेस्टोटल अलेकजेंडर ही गुरू शिष्य परंपरा आजतागायत प्रसिद्ध आहे.

सॉक्रेटिसचे सहा प्रकारचे प्रश्न

सॉक्रेटिस सहा प्रकारचे प्रश्न विचारत असे. अशा प्रश्नांमुळे अनेकदा लोकांना सुरुवातीला त्याचा राग येत असे परंतु नंतर त्याचा फायदाही त्यांना होई. ह्या प्रश्नांचा उद्देश लोकांच्या माहितीच्या अचूकतेला व परिपूर्णतेला एक आव्हान असे व त्यातून तो लोकांना त्यांच्या अडचणीच्या अथवा उद्देशाच्या दिशेने मार्गदर्शन करीत असे.

संकल्पनात्मक स्पष्टीकरणासाठी प्रश्न:

ज्या लोकांना एखाद्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे त्या मुद्द्याची त्यांच्यापाशीच कितपत एकवाक्यता आहे हे तो पाहत असे. त्यांना त्या मुद्द्यावर अधिक विचार करायला भाग पाडत असे. हे प्रश्न असे-

१. हे तुम्ही का म्हणताय


२. ...म्हणजे नक्की काय?

३. हे जे तुम्ही आता म्हणालाय ते आधीच्या मुद्द्याशी कसे लागू पडते?

४. ह्या मुद्द्याचे स्वरूप नेमके उलगडून सांगाल काय?

५. तुम्हाला ह्याबाबत आधीच काय काय माहीत आहे?

६. एखादे उदाहरण देऊ शकाल का?

७. तुम्ही हे .... म्हणताय की....?

८. कृपया हे जरा सोप्या पद्धतीने सांगाल का?

चौकशी प्रश्न

लोकांनी गृहीत धरलेल्या बाबींवर अधिक खोलवर माहिती घेण्यासाठी हे प्रश्न तो विचारत असे. ह्याचा उपयोग त्यांच्या आधीच गृहीत धरलेल्या शक्यता व आजवर ज्या आंधळ्या विश्वासाबद्दल त्यांना कोणीही काहीही प्रश्न विचारलेले असतील तर ते विचारल्यामुळे वाद घालणाऱ्यांना तो त्यांच्या मुद्द्यावर अधिक विचार करावयास भाग पाडे.

१. आपण अजून काय काय शक्यता गृहीत धरू शकू?

२. तुम्ही हे गृहीत धरले आहे का?

३. तुम्ही ह्याच शक्यतांची निवड का केलीत?

४. ह्या ज्या शक्यता गृहीत धरल्या आहेत त्याची पडताळणी कशी करता येईल?

५. काय होऊ शकते जर आपण....?

मुद्द्याचा पाया, कारणं आणि पुरावे ह्यांना प्रोब करणे:

जेव्हा लोक त्यांच्या मुद्द्याला धरून बसून त्याच्या शक्यतांना समर्थन देत असत, काही पुरावे मांडत असत त्यावेळी तो प्रश्न विचारून त्या मुद्द्याच्या पाया, कारणं आणि पुरावे ह्यांना प्रोब करत असे.

१. हे असे का होते आहे?

२. तुला हे कसे माहीत आहे?

३. दाखवू शकतोस?

४. उदाहरण देऊ शकतोस?

अंदाजांना पडताळून पाहण्याचे प्रश्न:

बऱ्याचदा चर्चा करताना मुद्दे हे एकाच पद्धतीने (दृष्टिकोनातून) पाहून मांडले जातात. त्या दृष्टिकोनाला आव्हान देण्यासाठी तो हे प्रश्न विचारत असे.

१. ह्याकडे पाहण्याचा एखादा वेगळा दृष्टिकोन आहे का?

२. ह्याकडे अशा पद्धतीने पाहणे रास्त आहे का?

३. ह्याचा फायदा कोणाला होईल?

४. ह्यात...आणि त्यात... काय फरक आहे?

एकमत परिणाम पडताळा

जर मुद्द्यावर एकमत झालेच तर त्याचे परिणाम काय होऊ शकतील हे पडताळण्याचे प्रश्न: एखादा निर्णय घेतलाच तर त्याचे काय परिणाम होऊ शकतील हे अंदाजाने पडताळून पाहणे श्रेयस्कर ठरते. त्याचा लोकांनी काही विचार केला आहे का ते पाहण्यासाठी तो हे प्रश्न विचारत असे.

१. मग काय होऊ शकते?

२. आपण हे... त्यासाठी कसे वापरू शकतो?

३. हे आपण पूर्वी अनुभवल्याप्रमाणे वेगळे अथवा तसेच कसे होऊ शकते?

४. हे असे होणे का महत्त्वाचे आहे?

प्रश्नावर प्रश्न:

एखादा प्रश्न सॉक्रेटिसलाच विचारला तर तो त्याचे उत्तर दुसरा प्रश्न विचारून देत असे!

१. ह्या प्रश्नाचा रोख काय आहे?

२. आधीचा प्रश्न मी का विचारला होता असे तुला वाटते?