सैतामा स्टेडियम २००२
सैतामा स्टेडियम २००२ (जपानी: 埼玉スタジアム2002) हे जपान देशाच्या सैतामा शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ६३,७०० इतकी आसनक्षमता असलेले हे स्टेडियम ऑक्टोबर २००१ मध्ये खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील चार सामने येथे खेळवण्यात आले होते. सध्या जपान फुटबॉल संघाचे हे प्रमुख मैदान आहे.
२०२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील फुटबॉल सामन्यांसाठी ह्या स्टेडियमचा वापर केला जाईल.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ[permanent dead link]