सेवाशुल्क
ग्राहकाला सेवा प्रदान करण्याबद्दल आकारल्या जाणाऱ्या रकमेला सेवाशुल्क (इंग्लिश Service Charge) असे म्हणतात.
सेवा शुल्क ही पुरातन काळापासून चालत आलेली प्रथा आहे . जुन्या काळात राजाचे सरदार सैनिक घोडे पुरवठा करायचे त्या बदल्यात राजा त्यांना किंवा गावांचा महसूल गोळा करण्याचा अधिकार द्यायचा.
सेवा प्रदान करणारे व्यवसाय उदा. बँक, हॉटेल, व्यावसायिक सेवा देणारे तज्ञ जसे की डॉक्टर, सनदी लेखापाल इत्यादी ग्राहकाकडून सेवा शुल्क वसूल करतात. सेवा शुल्क कसे आणि किती आकारायचे याबद्दल काही निर्देश नाहीत. प्रत्येक उद्योग आपल्याला योग्य वाटेल त्या प्रकारे व प्रतिस्पर्ध्याशी स्पर्धा प्रकारे सेवा शुल्क ठरवतो .
सेवा शुल्क हे एक ठराविक रक्कम किंवा दिलेल्या सेवेच्या काही प्रमाणात वसूल जाते.
विविध उद्योगात वेगवेगळ्या कारणासाठी शुल्क आकारले जाते
१) हॉटेल उद्योग - ग्राहकांना खाणे पुरवणे आणि त्यासाठी काही दराने घेणे या व्यतिरिक्त प्रत्येक हॉटेल ग्राहकाला थंडगार पाणी देणे, हॉटेलमध्ये वातानुकूलन यंत्रणा बसवणे, वाढपी आणि इतर कर्मचारी ठेवून हॉटेल मध्ये जेवणे हा एक चांगला अनुभव बनवण्यासाठी खर्च करते. या बदल्यात ग्राहकाला सेवा शुल्क द्यावे लागते. भारतात हा मुद्दा अजूनही वादग्रस्त आहे कारण भारत सरकारने एप्रिल २०१७ मध्ये जारी केलेल्या निर्देशानुसार हॉटेल मधील सेवा शुल्क देणे हे ग्राहकाच्या मर्जीवर अवलंबून आहे.[१]. परंतु हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेनुसार हे निर्देश म्हणजे कायदा नव्हे [२]. हॉटेलमध्ये बिल रकमेच्या काही टक्के रक्कम सेवा शुल्क म्हणून आकारली जाते .
२) अंगडिया सेवा - पत्रे किंवा वस्तूची एकीकडून दुसरीकडे ने आण करण्याबरोबरच अंगडिया लोक ग्राहकाच्या सोयीप्रमाणे आणि सोयीस्कर वेळी वस्तू पोहोचवतात त्या बदल्यात वस्तूचे वजन किंवा संख्या याच्या प्रमाणात शुल्क वसूल केले जाते .
३) दूरध्वनी तसेच ब्रॉडबँड सेवा - या सेवा पुरवण्यासाठी दिलेली उपकरणे तसेच या सेवा देण्यासाठी उभारलेले मूलभूत सुविधांचे जाळे या बद्दल सेवा शुल्क,ऍक्टिव्हेशन शुल्क या नावाने शुल्क वसुली केली जाते.
४) चित्रपटगृह - महाजालावरून चित्रपटाची तिकिटे विकत घेणे तसेच क्रेडिट कार्ड वापरून तिकिटाचे पैसे देणे या सेवांसाठी तिकीट दरापेक्षा काही अधिक रक्कम सेवा शुल्क म्हणून वसूल केली जाते.
५) बँक - बँकेत वसूल केले जाणारे सेवा शुल्क खालील प्रकारे असते
- धनादेश देण्यासाठी
- डिमांड ड्राफ्ट किंवा बँकर्स चेक देण्यासाठी
- सुरक्षा जमा कक्ष सेवा (लॉकर) प्रदान करणे
- खाते पुस्तक हरवले म्हणून दुसरी प्रत देण्याबद्दल
- खाते उताऱ्याची वाढीव प्रत देण्याबद्दल
- ग्राहकाच्या सहीचे सत्यापन करून देण्याबद्दल
- पतपत्र जारी करणे