सेवालाल महाराज
सेवा भीमासिंह रामावत ( नायक ) | ||
---|---|---|
क्रांतिसिंह सेवालाल महाराज | ||
पूर्ण नाव | सेवा भीमासिंह रामावत | |
जन्म | फेब्रुवारी १५, १७३९(1739) | |
राम जी नायक टांडा, बावन बराड़, गुत्ति - बल्लारी क्षेत्र सध्या ज्या नावाने ओळखले जाते सेवागढ़, गुत्ति मंडल, अनंतपुर जिला, आंध्र प्रदेश | ||
मृत्यू | जानेवारी ४, १७७३(1773) | |
रुईगड, यवतमाळ जिल्हा महाराष्ट्र | ||
पूर्वाधिकारी | नाही | |
उत्तराधिकारी | रामराव महाराज | |
वडील | भीमासिंह नायक | |
आई | धरमणीमाता | |
राजघराणे | बंजारा (गौर) |
क्रांतिसिंह सेवालाल महाराज (१५ फेब्रुवारी १७३९ - ४ जानेवारी १७७३ ) हे भारतीय समाजसुधारक होते. शूरवीर लढवय्या 'गोरराजवंशी बंजारा' समाजातील प्रख्यात सतगुरू होते. क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते.
सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक-धार्मिक क्षेत्रातील एक सुधारक होते. संत हाथीराम बाबा, बाबा लखीशाह बंजारा, संत रूपसिंह महाराज, क्रांतिकारी संत गोविंद गुरू बंजारा यासह हा शुरवीर गोरराजवंशी बंजारा समुदाय संत सेवालाल महाराजांना आपले आध्यात्मिक गुरू म्हणून मानतात. ते जगदंबेचे परम शिष्य होते. आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले. रामावत क्षत्रिय कुळातील भीमासिंह नाईक यांचे ते चिरंजीव होते.
धर्मणीयाडी (मातोश्री)
संत सेवालाल महाराज यांच्या आईचे नाव धरमणी होते. ती जयराम वडतीया (सुवर्णा कप्पा, कर्नाटक) यांची राजकन्या होती. भीमा नायक यांच्या लग्नानंतर त्यांना जवळजवळ १२ वर्षे मूलबाळ नव्हते, पुढे जगदंबा मातेची पूजा व कृपेमुळे धर्मनी व भीमा नाईक यांना सेवालाल महाराज यांचा जन्म झाला अशी बंजारा समाजात एक श्रद्धा आहे.
सेवालाल महाराज यांचे श्रीक्षेत्र रुईगड येथे निधन झाले. आणि महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे त्यांची समाधी आजही जगदंबेच्या मंदिराशेजारी आहे. आध्यात्मिक आणि समाजप्रबोधनातून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. सेवालाल महाराज यांची भविष्यवाणी आजही काळाच्या कसोटीवर तंतोतंत खरी ठरली आहे. बंजारा समाजातील महायोद्धा राजा लखीशाह बंजारा, गोर राजाभोज, क्रांतिकारी संत गोविंद गुरू बंजारा ,बाबा मख्खनशाह बंजारा, शूरवीर बल्लुराय बंजारा, वीरांगना मल्लिका बंजारन , गोरा -बादल , आला उदल , नायक मनिसिंह पवार , राजागोपीचंद गोर , वीरांगना दूर्गावती बंजारन , वीर दुर्गादास राठोड , जयमल फत्ता सिंह या शुर पराक्रमीच्या इतिहासाच्या शौर्यगाथा आजही बंजारा साहित्य बरोबरच शिख इतिहासात सुद्धा दिसून येते. माता जगदंबा बंजारा देवी , व्यंकटेश्वर बालाजी , संत हाथीराम बाबा महाराज , संत रूपसिंह महाराज यासह संत सेवालाल महाराज आणि संत सामकी माता यांना समाजात विशेष आस्थेचे स्थान आहे.
क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांची शिकवण
- जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा.
- कोणालाही किंवा कोणत्याही प्रकारात भेदभाव करू नका.
- सन्मानाने आयुष्य जगा.
- इतरांशी वाईट बोलू नका आणि इतरांना इजा करु नका.
- स्त्रियांचा सन्मान करा, आणि मुली जिवंत देवी आहेत.
- काळजी करू नका आणि संकटाला निर्भयपणे तोंड दया, धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा.
- पाण्याचे रक्षण करा आणि तहानलेल्यांना पाणीपुरवठा करा आणि कधीही पाणी विकण्यास गुंतवू नका जे सर्वात मोठे गुन्हा / पाप आहे.
- वडीलधारी माणसांचा आदर करा आणि तरुणांवर प्रेम करा आणि प्राण्यांचा देखील आदर करा.
- जंगलाला कधीही सोडू नका आणि जंगल नष्ट करू नका, जर आपण जंगल नष्ट केले तर आपण स्वतःला नष्ट करीत आहात.
- मनन केल्याने आंतरिक शांती मिळेल, आणि अभ्यास करा, ज्ञान मिळवा आणि ज्ञान इतरांना वाटा.
- माणुसकीवर प्रेम करा.
- आयुष्यावर तर्क करा आणि सर्व अंधश्रद्धायुक्त विश्वास टाळा.
- कुटूंबाची आणि समाजाची काळजी घ्या आणि समाजातील बंधुता कधीही भंग करु नका.
धैर्य मानवतेच्या शिस्त, चिंतनशील आणि एक बुद्धीप्रामाण्यवादी संत होते. अंधकारात सापडलेल्या भक्तांना त्यातून मार्ग काढण्यासाठी सदोदित मार्गदाता म्हणून आजीवन भूमिका केली.
सेवालाल महाराज यांचे वचन
क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांनी आपल्या गौर बंजारा भाषेत दिलेला उपदेश.
- रपीया कटोरो पांळी वक जाय।- भावार्थः एका रूपयाला एक वाटी पाणी विकेल।
- कसाईन गावढी मत वेचो। – भावार्थः खाटीकला गाय विकू नका। पशू प्राण्यावर प्रेम करा।
- जिवते धंणीरो बीर घरेम मत लावजो। – भावार्थः जिवंत नवरा असणाऱ्या स्त्रीला आपली बायको म्हणून घरात आणू नका।
- चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो। – भावार्थः चोरी करून खोट बोलून पैसा कमाऊ नका किंवा तशा पैसा घरात आणू नका।
- केरी निंदा बदी चाडी जूगली मत करजो। – भावार्थः कोनाची निंदा चाडी चूगली लावा लावी करू नका।
- जाणंजो छाणंजो पछच माणजो। -भावार्थः जाणून घ्या विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा।
- ये जो वातेर पत रकाडीय वोन पाने आड पान तारलीयुंव। – भावार्थः ह्या गोष्टीचा जो कोनी आदर करेल, आचरणात आणेल स्वीकार करेल मी त्याचा रक्षण करेल. पाना आड पान मी त्याला तारेल।
संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता , पर्यावरण रक्षण,गोरक्षाचा संदेश दिला. महाराष्ट्र व तेलंगाना राज्यात संत सेवालाल महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी केली जाते. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरूद्ध लढा सुद्धा उभारला होता. समाजातील अनिष्ठ रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून प्रहार चढवून सामाजिक सुधारणासाठी आग्रही भूमिका घेतली.
... संत सेवालाल महाराज यांचे खरे झालेले बोल
संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजातील थोर पुरुष होते आज ही बंजारा समाजातील लोक सेवालाल महाराज यांची पूजा अर्चना करतात आणि सेवालाल महाराज यांचा विचार जपून ठेवतात सेवालाल महाराज यांनी दिलेले वचन खरे झाले रपिया कटोरो पाणि वक जाये रापिया र ढेर चना वक जाये मलके रो दख आजये डॉक्टर रेन ओर इलाज मळ कोणी घर घर जायेरो बंद वेजया बेटा बापेर समाळ कोणी
कोई केणी भजो मत कोई केनी पुजो मत भजे पुजे म वेळ मत घालो ये सेवभाया र विचार छ बोलो सेवालाल महाराज की जय
येमाही काही चूक वेगीविये तो आपलो नानक्या भाई समजणं माफ करदो
पवन राठोड 9075282864